अध्यक्षपदी नंदलाल चौधरी,महासचिव अर्पण बिसेन, तर संघटन सचिवपदी गोंदिया राजकुमार पटले
नागपूर,दि.२५ ःराष्ट्रीय पवार क्षत्रिय महासभा भारत च्या नविन कार्यकारिणीची घोषणा २३ मार्च रोजी महासभेच्या नागपूर येथील कुकडे ले-आऊट परिसरातील विद्यार्थी भवनात आयोजित महासभेच्या बैठकीत करण्यात आली. विद्यमान अध्यक्ष इंजी.मुरलीधर टेंभरे यांच्या प्रमुख उपस्थितीत सन २०२५-२०३० कार्यकारिणीचे निर्विरोध गठन करण्यात आले. यामध्ये अध्यक्षपदी रायपूरचे नंदलाल चौधरी, सिवनीचे महासचिवपदी अर्पण बिसेन तर संघटन सचिवपदी गोंदियाचे राजकुमार पटले यांची निवड करण्यात आली.
विशेष म्हणजे, यापुर्वीची कार्यकारिणी निवडणूक प्रक्रियेने गठीत करण्यात आली होती. मात्र ११ मार्च रोजी महासभेच्या सरंक्षक मंडळाच्या पार पडलेल्या कार्यकारिणी निवडणुकीच्या सभेत सर्वानुमते निवड करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.त्यानुसार २३ मार्च रोजी राष्ट्रीय पवार क्षत्रिय महासभेचे अध्यक्ष नंदलाल चौधरी(भिलाई), महासचिव अर्पण बिसेन(सिवनी), कोषाध्यक्ष डूलेन्द्र ठाकरे(बैहर), संघटन सचिव राजकुमार पटले(गोंदिया), उपाध्यक्ष जियालाल शरणागत(नागपूर), बसंत बिसेन(रायपूर), उपाध्यक्ष खिलेन्द्र टेंभरे(बालाघाट) यांची निवड करण्यात आली.

याप्रसंगी राष्ट्रीय पवार महासभेचे मावळते अध्यक्ष मुरलीधर टेंभरे, माजी अध्यक्ष इंजी.टी.डी.बिसेन,प्रा.गौरीशंकर टेंंभरे, डा.रामकिशोर बिसेन,निवडणूक अधिकारी हेमंत रहागंडाले,मावळते संघटन सचिव खेमेंद्र कटरे,उपाध्यक्ष मोतीलाल चौधरी आदि पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते. सर्व नवनियुक्त पदाधिकार्यांचे अभिनंदन करण्यात आले. समाजाच्या उन्नती व प्रगतीसाठी प्रयत्न करणार, असे नवनियुक्त अध्यक्ष व पदाधिकार्यांनी मनोगत व्यक्त केले. यांचे अभिनंदन करण्यात आले. समाजाच्या उन्नती व प्रगतीसाठी प्रयत्न करणार, असे नवनियुक्त अध्यक्ष व पदाधिकार्यांनी मनोगत व्यक्त केले.ॅड.रामकिशोर बिसेन,निवडणूक अधिकारी हेमंत रहागंडाले,मावळते संघटन सचिव खेमेंद्र कटरे आदि पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते. सर्व नवनियुक्त पदाधिकार्यांचे अभिनंदन करण्यात आले. समाजाच्या उन्नती व प्रगतीसाठी प्रयत्न करणार, असे नवनियुक्त अध्यक्ष व पदाधिकार्यांनी मनोगत व्यक्त केले.