सोनी आणि बोटे येथे ३० लक्ष रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन

0
118

गोरेगाव :  तालुक्यातील सोनी आणि बोटे येथे एकूण ३० लक्ष रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन गोंदिया जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष पंकज रहांगडाले यांच्या हस्ते परिसरातील गणमान्य नागरिक, लोकप्रतिनिधी यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. यात बोटे- मानेगाव रस्ता ₹10.00 लक्ष, सोनी- मानेगाव रस्ता ₹10.00 लक्ष आणि सोनी – बोटे रस्ता ₹10.00 लक्ष या कामांचा समावेश आहे. या रस्त्यांमुळे दळणवळण अधिक सुलभ होईल अशी आशा पंकज रहांगडाले यांनी व्यक्त केली. गोंदिया जिल्हा हा धान उत्पादक जिल्हा आहे. भाजप सरकार सत्तेत आल्यापासून धानाला बोनस देण्याची परंपरा सुरू करण्यात आली होती ज्याला अनुसरून यंदा सुद्धा २० हजार रुपये प्रति हेक्टरी बोनस शासनाने जाहीर केला आहे. लवकरच हा बोनस शेतकरी बांधवांच्या खात्यात वर्ग केल्या जाणार आहे. सोबतच नुकत्याच जाहीर झालेल्या अर्थसंकल्पात गोंदिया सह राज्यातील सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यात येणार आहे अशी माहिती त्यांनी उपस्थित नागरिकांना दिली. शेतकरी बांधवाना किसान सन्मान निधी असेल किंवा नुकसानभरपाई त्यासाठी फार्मर आयडी असणे बंधनकारक करण्यात आले आहे त्यामुळे शेतकरी बांधवांनी आपला फार्मर आयडी काढून घ्यावा आणि सोबतच आपले राशन कार्ड केवायसी करून घ्यावे म्हणजे राशन दुकानात राशन घेताना अडचण होणार नाही असे आवाहन केले.

यावेळी किशोर भाऊ पारधी सदस्य पंचायत समिती गोरेगाव, सोनी येथील कार्यक्रमात सरपंच सौ. हेमेश्वरीताई हरीणखेडे, उपसरपंच झनकलालजी चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य चंद्रशेखरजी पुंडे,पियुषजी बघेले,तिलकचंदजी पटले,नारायणजी पटले,लिलाबाई कोहरे,ममताबाई पटले,सरिताबाई पुंडे,सुशीलाबाई धारापिंडे, ममताबाई धारापिंडे,संजय मेश्राम,  नरेंद्र मरसकोल्हे,कृष्णाजी बोपचे, सौ. आशाबाई बोपचे,भूमेश्वर चव्हाण,दिनेश पटले,कमलेश पटले,लोकचंद पटले तसेच ग्राम बोटे येथील कार्यक्रमात सरपंच सौ. नंदादेवी कटरे, उपसरपंच सौ. पूजाताई धमगाये,उत्तमभाऊ कटरे,  श्रीकांत कांबळे,चुन्नीलाल बोपचे,प्रशांत कटरे,खुशाल ठाकूर,सुभाष मेश्राम, सौ. सेवांगनाबाई टेंभुर्णीकर,रोहित साखरे आणि ग्रामस्थ उपस्थित होते.