देवरीच्या जंगलात अस्वल दर्शन

0
1027

देवरी-उन्हाळ्याची चाहूल लागताच जंगल परिसरात पाण्याच्या शोधात वन्य प्राण्यांचे दर्शन घडते. असेच गोंदिया जिल्ह्यात देवरी तालुक्यातील लेंडीजोबच्या जंगलात मंगळवार २५ मार्च २०२५ ला सकाळी ६:३० ते ७:०० वाजताच्या दरम्यान गावातील काही नागरिक मोहफुल वेचण्याकरिता, गावा जवळील जंगलात जात असताना त्यांना अस्वल दिसले. त्यांनी त्याची चित्रफित तयार करून ती समाज माध्यमावर प्रसारित केली . यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

गोंदिया जिल्ह्यातील ग्रामीण भागात सध्या मार्च महिन्या दरम्यान मोहफुल वेचणीचा हंगाम सुरू आहे. त्यातच देवरी तालुका हा आदिवासी बाहुल असून, मोहफुल वेचण्याकरिता तालुक्यातील नागरिक मोठ्या प्रमाणात जंगला मध्ये जातात.अस्वलाला पाहण्याकरिता गावातील लोक जंगलाच्या दिशेने धावत सुटले होते. पण या सोबतच मोहफुल वेचणाऱ्या नागरिकांच्या मनात जंगलात अस्वल दर्शन झाल्यामुळे भीतीचे वातावरण सुद्धा पसरले आहे.