सतत दोन वर्षापासुन टिबी मुक्त 43 ग्रामपंचायतीना महात्मा गांधी यांचा सिल्वर पुतळा
पहिल्या वर्षी टीबी मुक्त 183 ग्रामपंचायतींना महात्मा गांधी यांचा कास्य पुतळा
गोंदिया,दि.२५ः क्षयरोगमुक्त भारत संकल्पना राबविताना गोंदिया जिल्ह्यातील 226 ग्रामपंचायतींनी महत्त्वाचा टप्पा गाठला आहे.जागतिक क्षयरोग दिन 24 मार्च निमित्त राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील एकूण 226 ग्रामपंचायतींना ‘क्षयरोग मुक्त ग्रामपंचायत पुरस्कार’ देण्यात आला.
क्षयरोग मुक्त ग्रामपंचायतींचा पुरस्कार सोहळा दि.24 मार्च रोजी जागतिक क्षयरोग दिनाचे औचित्य साधुन पोवार बिल्डींग, कन्हारटोली येथे संपन्न झाला.दरवर्षी जागतिक आरोग्य संघटनेकडून एका संकल्पनेवर एक भर दिला जातो.जागतिक क्षयरोग दिन दि.24 मार्च 2025 यंदाची थीम “Yes, We Can End TB”(होय, आपण क्षयरोग निश्चितपणे संपवू शकतो. प्रतिज्ञा करा, तरतूद करा सेवा द्या) अशी आहे.या संकल्पनेनुसार काम करणाऱ्या ग्रामपंचायतींना पुरस्कार देण्यात आल्याची माहीती जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ अभिजित गोल्हार यांनी दिली आहे.
केंद्र शासनाने 2025 पर्यंत क्षयरोगमुक्त करण्याचे धोरण आखले आहे.जिल्हाधिकारी प्रजित नायर व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम.मुरुगानंथम यांच्या मार्गदर्शनात आरोग्य विभागाच्या माध्यमातून वर्ष 2023 पासुन जिल्ह्यात टीबी मुक्त गाव या संकल्पनेतून टीबी मुक्त ग्रामपंचायत अभियान राबविण्यात येत आहे.या उपक्रमांमध्ये प्रत्येक ग्रामपंचायत क्षेत्रात क्षय रुग्णांचा शोध घेण्यात येत आहे. जागतिक क्षयरोग दिन 24 मार्चच्या अनुशंगाने टि.बी.फ्री निकष पुर्ण करणार्या 226 ग्रामपंचायतीना गौरविण्यात येत आहे.त्यांना महात्मा गांधी यांचा पुतळा व प्रमाणपत्र देवुन सत्कार करण्यात येत असल्याची माहीती जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.अभिजीत गोल्हार यांनी प्रास्तविका मध्ये माहीती दिली.
यावेळी खाजगी रुग्णालयातील तज्ञ डॉक्टर डॉ.अमित जयस्वाल,डॉ.सचिन केलंका,डॉ. बजाज यांना सुद्धा त्यांच्या क्षयरोग कार्याच्या भरीव योगदानाबद्दल गौरविण्यात आले.
पुरस्कार वितरण सोहळा कार्यक्रम जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा आरोग्य व शिक्षण सभापती सुरेश हर्षे,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.तानाजी लोखंडे,शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.कुसुमाकर घोरपडे,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अमरीश मोहबे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन वानखेडे,उपमुख्य कार्यकारी अधिकारी(ग्रामपंचायत) मधुकर वासनिक यांचे सह सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अरविंद कुमार वाघमारे,सहाय्यक संचालक कुष्ठरोग डॉ.महेंद्र धनविजय,जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.विनोद चव्हाण,गोंदिया तालुका खंड विकास अधिकारी गौतम,जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.अभिजित गोल्हार,मोरगावअर्जुनी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सुकन्या कांबळे,सडक अर्जुनी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रणित पाटील,जिल्हा माध्यम व विस्तार अधिकारी विजय आखाडे,वैद्यकीय अधिकारी डॉ.वेदप्रकाश चौरागडे,डॉ.देव चांदेवार, डॉ.भाग्यश्री गावंडे,जिल्हा आयईसी अधिकारी प्रशांत खरात ,पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतींचे सरपंच,समुदाय आरोग्य अधिकारी,आरोग्य सेवक,आरोग्य सेविका आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
क्षयरोग उपचारासाठी आवश्यक प्रचार प्रसिद्धी तसेच लोकसहभागातून निक्षयमित्र योजनेतुन गोरगरीब क्षयरोग रुग्णांसाठी फूड बास्केट गावातील समाजमित्र/पदाधिकारी यांनी उपलब्ध करुन द्यावे तसेच या आजाराची लक्षणे आढळल्यास त्वरित जवळच्या आरोग्य केंद्रात तपासणी करून उपचार घ्यावेत.तसेच इतरांनाही याबाबत जागरूक करावे, असे आवाहन जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा आरोग्य व शिक्षण सभापती सुरेश हर्षे यांनी यावेळी केले.
क्षयरोगमुक्त जिल्ह्यासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा-ग्रामपंचायती, आरोग्य विभाग आणि आशा कार्यकर्त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे हा यशस्वी उपक्रम राबविण्यात आला. क्षयरोगमुक्त जिल्हा करण्यासाठी आपण सर्वांनी अधिक जोमाने कार्य करावे, असे आवाहन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.तानाजी लोखंडे यांनी यावेळी केले.
टीबी मुक्त गाव अभियानातील उपक्रम आरोग्य विभागाने काटेकोरपणे राबविल्याने ग्रामपंचायती टीबी मुक्त झाल्या आहेत.यात गावपातळी वरची आशा सेविकापासुन उपकेंद्र स्तरावरील समुदाय आरोग्य अधिकारी,आरोग्य सेवक,आरोग्य सेविका तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावरील वैद्यकीय अधिकारी, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, फार्मासिस्ट,आशा सेविका व सर्वच क्षेत्रीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी योगदान दिले असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन वानखेडे यांनी सांगितले.
गनखेरा सांस्कृतीक कलापथकच्या माध्यमातुन क्षयरोगावर आधारित जनजागृती पथनाट्य यावेळी सादर केले.कार्यक्रमाचे संचालन पवन वासनिक व शेवटी आभार प्रदर्शन वैद्यकीय अधिकारी डॉ.वेदप्रकाश चौरागडे यांनी केले.यावेळी आरोग्य विभागाचे सर्व अधिकारी कर्मचारी आणि संपूर्ण क्षयरोग निर्मूलनाचे काम करणारी टीम उपस्थित होती.