सडक अर्जुनी तालुक्यातील 30 ग्रामपंचायतींना ‘क्षयरोग मुक्त ग्रामपंचायत पुरस्कार’

0
84

सतत दोन वर्षापासुन टिबी मुक्त राहिल्याने 11 ग्रामपंचायतीना महात्मा गांधी यांचा सिल्वर पुतळा
पहिल्या वर्षी टीबी मुक्त राहिल्याने 19 ग्रामपंचायतींना महात्मा गांधी यांचा कास्य पुतळा

गोंदिया,दि.२७ मार्चः- जागतिक क्षयरोग दिनानिमित्ताने क्षयरोग मुक्त ग्रामपंचायत अभियान अंतर्गत  वर्ष 2024 करीता  सडक अर्जुनी तालुक्यातील 30 ग्रामपंचायतींना ‘क्षयरोग मुक्त ग्रामपंचायत पुरस्कार’प्रदान करण्यात आले.सतत दोन वर्षापासुन टिबी मुक्त राहिल्याने 11 ग्रामपंचायतीना महात्मा गांधी यांचा सिल्वर पुतळा व पहिल्या वर्षी टीबी मुक्त राहिल्याने 19 ग्रामपंचायतींना महात्मा गांधी यांचा कास्य पुतळा  व सन्मान पत्र देऊन सत्कार करण्यात आल्याची माहीती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रणित पाटिल यांनी दिली आहे.
क्षयरोग मुक्त ग्रामपंचायतींचा पुरस्कार सोहळा दि.24 मार्च रोजी जागतिक क्षयरोग दिनाचे औचित्य साधुन पोवार बिल्डींग,कन्हारटोली येथे संपन्न झाला.दरवर्षी जागतिक आरोग्य संघटनेकडून एका संकल्पनेवर एक भर दिला जातो.जागतिक क्षयरोग दिन दि.24 मार्च 2025 यंदाची थीम “Yes, We Can End TB” (होय, आपण क्षयरोग निश्चितपणे संपवू शकतो.प्रतिज्ञा करा, तरतूद करा सेवा द्या) अशी आहे.या संकल्पनेनुसार काम करणाऱ्या ग्रामपंचायतींना पुरस्कार देण्यात आल्याची माहीती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रणित पाटिल यांनी यांनी दिली आहे.
पुरस्कार वितरण सोहळा कार्यक्रम जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा आरोग्य व शिक्षण सभापती सुरेशजी हर्षे,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.तानाजी लोखंडे,शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.कुसुमाकर घोरपडे,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अमरीश मोहबे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन वानखेडे,उपमुख्य कार्यकारी अधिकारी(ग्रामपंचायत) मधुकर वासनिक यांचे सह सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अरविंद कुमार वाघमारे,सहाय्यक संचालक कुष्ठरोग डॉ.महेंद्र धनविजय,जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.विनोद चव्हाण,गोंदिया तालुका खंड विकास अधिकारी गौतम,जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.अभिजित गोल्हार,मोरगावअर्जुनी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सुकन्या कांबळे,सडक अर्जुनी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रणित पाटील,जिल्हा माध्यम व विस्तार अधिकारी विजय आखाडे,वैद्यकीय अधिकारी डॉ.वेदप्रकाश चौरागडे,डॉ.देव चांदेवार, डॉ.भाग्यश्री गावंडे,जिल्हा आयईसी अधिकारी प्रशांत खरात ,पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतींचे सरपंच,समुदाय आरोग्य अधिकारी,आरोग्य सेवक,आरोग्य सेविका आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
ब्राँझ करिता 19 ग्रामपंचायत व सिल्व्हर मेडल करीता 11 ग्रामपंचायत  पात्र ठरल्या त्या ग्राम पंचायतिला  मेडल आणि सन्मान पत्र देऊन सत्कार करण्यात आला…
क्षयरोग मुक्त ग्रामपंचायत सिल्व्हर मेडल विजेते ग्राम पंचायत
त्यात प्राथमिक आरोग्य केंद्र डव्वा अंतर्गत  ग्रामपंचायत जांभळी, ग्रामपंचायत डव्वा.
प्राथमिक आरोग्य केंद्र शेंडा अंतर्गत  ग्रामपंचायत बाम्हणी, ग्रामपंचायत खडकी .
प्राथमिक आरोग्य केंद्र खोडशिवणी अंतर्गत ग्रामपंचायत घाटबोरी तेली,ग्रामपंचायत कोहली, ग्रामपंचायत बोपाबोडी.
प्राथमिक आरोग्य केंद्र पांढरी अंतर्गत ग्रामपंचायत मुरपार राम,ग्रामपंचायत घटेगाव .
प्राथमिक आरोग्य केंद्र चिखली अंतर्गत ग्रामपंचायत दुग्गीपार, ग्रामपंचायत पांढरवाणी.
 क्षयरोग मुक्त ग्रामपंचायत ब्राँझ मेडल विजेते ग्राम पंचायत
त्यात प्राथमिक आरोग्य केंद्र डव्वा अंतर्गत  ग्रामपंचायत पळसगाव (डवा),ग्रामपंचायत पाटेकुर्रा, ग्रामपंचायत भुसारीटोला,ग्रामपंचायत गोपाळटोली,ग्रामपंचायत कोहलीटोला ,ग्रामपंचायत बोथली
प्राथमिक आरोग्य केंद्र शेंडा अंतर्गत  ग्रामपंचायत उशिखेडा,ग्रामपंचायत दल्ली .
प्राथमिक आरोग्य केंद्र खोडशिवणी अंतर्गत ग्रामपंचायत खोडशिवणी ,ग्रामपंचायत सिंधीपार, ग्रामपंचायत बाम्हणी सडक,ग्रामपंचायत गिरोला
प्राथमिक आरोग्य केंद्र पांढरी अंतर्गत ग्रामपंचायत गोंगले,ग्रामपंचायत खाडीपार,ग्रामपंचायत मुंडिपार /ई.
प्राथमिक आरोग्य केंद्र चिखली अंतर्गत ग्रामपंचायत कोसबी ,ग्रामपंचायत कोकणा जमी,ग्रामपंचायत पळसगाव रा.,ग्रामपंचायत फूटाळा
क्षयरोग मुक्त ग्रामपंचायत अभियान अंतर्गत   सडक अर्जुनी तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, गट विकास अधिकारी रविकांत सानप, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रणित पाटिल, वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक देवेंद्र भाजीपाले, तालुका आरोग्य सहाय्यक अजय वासनिक, आरोग्य विस्तार अधिकारी  अशोक शेंडे यांनी मोलाची कामगिरी केली आहे.