महिला व विद्यार्थी प्रशिक्षण शिबीर गोंदिया येथे.
गोंदिया,दि.३१ :- समता सैनिक दल व भारतीय बौद्ध महासभा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तीन दिवसीय महिला व विद्यार्थी प्रशिक्षण शिबीरात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती नागपूर द्वारे चमत्कार सादरीकरण व जादूटोणा विरोधी कायदाचे प्रशिक्षण देण्यात आले.
मैत्रैय बौद्ध विहार भीमनगर गोंदिया येथील प्रशस्त प्रांगणात आयोजित या शिबिराला गोंदिया जिल्ह्यातील ग्रामीण परिसरातून प्रशिक्षणासाठी विद्यार्थी व महिला तीन दिवसीय निवासी आल्या होत्या.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डी एफ कोचे यांनी भुषविले होते तर मंचकावर गजेंद्र गजभिये, राष्ट्रीय स्टाफ आफिसर स.सै.दल,आर सी फुल्लुके भंडारा जिल्हा ससैद, महाअंनिस गोंदिया शाखेचे प्रधान सचिव विनोद बनसोड, व कार्याध्यक्ष अनिल गोंडाने , विराजमान होते. संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामुहिक वाचन जिल्हा निधी संकलन कार्यवाह चंद्रशेखर मेश्राम यांनी केले.व चळवळीचे गीतं सादर करुन उत्तर नागपूर चे कार्याध्यक्ष देवानंद बडगे यांनी कार्यक्रमात रंगत आणली. राज्य कार्यकारिणी सदस्य रामभाऊ डोंगरे यांनी महा अंनिस चे कार्य व उद्देश काय हे प्रस्तावनेत सादर केले तर देवानंद बडगे यांना सोबत घेऊन चमत्काराचे विविध प्रयोग सादर केले.
त्यात पाण्याने दिवा जाळूने, पैशाचा पाऊस पाडणे, दोरखंड कापुन जसेचे तसे जोडणे, लोखंडी लंगर सोडवीणे व मंत्राने हवन ला जाळणे ई प्रमुख चमत्कार सादर करुन विद्यार्थी व महिलांना मंत्रमुग्ध केले.
या प्रसंगी उपस्थित सर्व महिलांना अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राचा जागतिक महिला दिन विशेषांक भेट म्हणून देण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नागपूर जिल्हा कार्याध्यक्ष चित्तरंजन चौरे यांनी तर आभार समता सैनिक दलाच्या म.प्र राज्याचे प्रमुख कुंवरलाल रामटेके यांनी मानले.शिबीराला गोंदिया ग्रामीण मधुन रंजना वालदे, प्रेमलता राऊत, शिवमाला मडामे, तर शहरी प्रभागातून किरण वासनिक, ज्योती बोरकर, शशीकला वैद्य , चित्रा मेश्राम, वैशाली ताई, वंदना चौरे, छाया मेश्राम, तक्षशिला गडपायले, संध्या रामटेके, केशर डहाट, शोभा वैद्य,लता वासनिक, सुनीता रंगारी,मंदा बनसोड, लक्ष्मी राऊत ,अंशुल राऊत, स्वप्निल गणवीर, विलास राऊत, व विद्यार्थी वर्ग व परिसरातील नागरिक उपस्थित होते.