गुढीपाडवा आणि नववर्ष कार्यक्रमात एक्यूटचे उत्कृष्ठ प्रदर्शन

0
13

गोंदिया,दि.३१ः संस्कार भारती महिला शक्ती संघटन आणि सिव्हिल लॉयन्स क्लब द्वारा आयोजित गुढीपाडवा आणि नववर्षाच्या कार्यक्रमात एक्यूट पब्लिक शाळा गोंदियाच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ठ प्रदर्शन केले. यामध्ये विद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृतिचे सजीव दर्शन दाखविताना पारंपारिक वेशभूषा धारण करून प्रभू श्री राम, लक्ष्मण, सिता व हनुमानाची भूमिका साकारली.त्यात अनुक्रमे वरुण येडे , तरुण येडे ,भाव्या तुरकर व युगल अग्रवाल या विद्यार्थ्यांचा सहभाग होता. तसेच शिवाजीच्या भूमिकेत विवान राऊत, सईबाईच्या भूमिकेत रिया वरखडे . सकाळी ८वाजता महाआरती, भजन, हनुमान चालीसा, गणेशवंदना इ. कार्यक्रम सिव्हिल लाईनच्या हनुमान मंदिर परिसरात घेण्यात आले. कार्यक्रमाला लाभलेले अध्यक्ष म्हणून वाय. पी. येडे, अशोक हरिनखेडे, महामंत्री दिगंबर लिचडे, सहमंत्री संतोष वंजारी, सदस्य अनिल सदन, रतनलाल पटले, सौ वंदना कटरे, संज्योत बहुद्देशीय शिक्षण संस्थेचे सचिव संजय कुमार भास्कर, मुख्याध्यापिका नंदा राऊत व संपूर्ण शिक्षक वृंद आणि शिक्षकेत्तर कर्मचारी इथे उपस्थित होते.