अर्जुनी-मोर.-पुर्व विदर्भातील झाडीपट्टी ही लोककलावंतांची खाण आहे.भंडारा,गोंदिया, गडचिरोली,व चंद्रपुर या झाडीपट्टी जिल्ह्यातुन अनेक कलावंत तयार होवुन नावलौकिक प्राप्त केले आहे.पुर्व विदर्भातील चारही जिल्ह्यात दंडार,तमाशा, गोंधळ,नाटकं,कव्वाली,या क्षेत्रातही अनेक कलावंत निर्माण झाले आहे.रात्रभर प्रेक्षकांना खिळवून बनविणारे कार्यक्रम व कलावंत झाडीपट्टीची शान ठरीत आहेत. तेव्हा कलावंतानी झाडीपट्टीचे अस्तीत्व टिकवुन ठेवावे असे आवाहण अर्जुनी-मोर. नगरपंचायत चे बांधकाम सभापती दानेश साखरे यांनी केले आहे.
अर्जुनी-मोर. येथे आयोजित जिल्हास्तरीय लोककलावंत सम्मेलनात विशेष मार्गदर्शक म्हणून साखरे बोलत होते.अर्जुनी/मोर येथे जि. प. कनिष्ठ महाविद्यालयच्या सभागृहात अमर विठोबा नारी शक्ती लोककला व क्रीडा बहुउद्देशीय संस्था माहुरकुडा च्या सौजन्याने जिल्हा स्तरीय झाडीपट्टी लोककलावंत सम्मेलनाचे आयोजन करण्यात आले होते.
या जिल्हा स्तरीय झाडीपट्टी लोककलावंत सम्मेलनात विदर्भातील तमाशा, नाटक, दंडार, गोंधळ, भजन, किर्तन, भारूड, डहाके, लावनी,कव्वाली, आदिवासी नृत्य, गीत, जात्यावरची गाणी, रोवन्याची गाणी, पांगुळ, वासुदेव, तसेच झाडीपट्टी तील विविध कलेचे कलावंतांनी उपस्थित होऊन आपल्या कलेचे सादरीकरण केले. अर्जुनी-मोर. नगरपंचायतचे बांधकाम सभापती दानेश साखरे यांनी दिप प्रज्वलन करून उपस्थित मंडळांना मार्गदर्शन केले, जानवाचे सरपंच किशोर ब्राह्मणकर यांच्या हस्ते उद्घाटन पार पडले व कलावंतांनी कलेची जोपासना करून थोर संत,समाजसुधारक,लोकशाहिरयांचे विचार आत्मसात करावे. विषेश अतिथी-पकेज समिती सदस्य वसंता कुंभारे, प्रमुख पाहुणे-भंडारा जिल्हाध्यक्ष डॉ. रामनाथजी पारधीकर वि. शा. क. प.,केंद्रीय सदस्य मिलिंद खोब्रागडे, लाखनीचे तालुकाध्यक्ष केशव फसाटे, जिल्हा महिला प्रतिनिधी सौ. कोमलताई झोडे, करंटचे सचिव खेमराज वाघाडे, विश्वनाथ जगनाडे, तिमेशर फसाटे,अशोक मेश्राम ,संजय भोयर, चंद्रशेखर बागडे, श्रीमती मंगला शहारे, नेताजी शेंडे, ठाकरे महाराज, तेजराम बन्सोड,बिमल बिश्वास,दशरथ गायकवाड,किशोर तरोणे, कांचन दास कान्हेकर, लंजे महाराज, संजय दाने, संस्थेच्या संस्थापिका सौ. शालिनीताई डोंगरे यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे संचालन मिलिंद खोब्रागडे यांनी केले. उपस्थितांचे आभार अमर ठेंगरी यांनी मानले.