जगत महाविद्यालयात विद्यार्थ्यासंह डाॅ.भैरम व रहागंडाले यांचा निरोप समारंभ

0
313

गोरेगांव,दि.०२--येथील जगत कला, वाणिज्य व इं.ह.प. विज्ञान महाविद्यालय गोरेगाव येथे बि.एस.सी. द्वितीय व प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी बि.एस.सी. अंतीम वर्षाच्या विद्यार्थ्यांकरिता तसेच सत्कार मुर्ती डॉ. एस. एच. भैरम व आर. के. राहांगडाले यांच्याकरीता निरोप समारंभाचे आयोजन करीत सत्कार केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्राचार्य डाॅ. एन. वाय. लंजे यांनी भुषविले. प्रमुख अतिथी प्रा. व्हि.आय. राणे, डॉ. एस.टी. नंदेश्वर, डॉ. संजीव एस. राहांगडाले व डॉ. कु. डब्लु.जे. मेश्राम हे होते. कार्यक्रमाला डॉ. बि.जी. सुर्यवंशी, डॉ. व्हि.यु. राहांगडाले, डॉ. एस.वाय. राहांगडाले. प्रा. के.पी. जाधव, प्रा. कु. एच.डी. मानकर, प्रा. वृषभ खुणे, प्रा. निखील परशुरामकर, प्रा. एम.बि. राय, श्री. एम.पी. सोनेवाने, बि.डब्लु. मेश्राम,के.सी. कटरे व इतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. जी.के. भगत यांनी सादर केले. ह्याप्रसंगी डॉ. एस.एच भैरम (उपप्राचार्य) व आर.के. राहांगडाले यांचा शाल व श्रीफळ देऊन समारोपीय सत्कार करण्यात आला. निरोप घेतांना विद्यार्थ्यांनी आपापले मनोगत व्यक्त केले. डॉ. एन. वाय. लंजे (प्राचार्य) यांनी अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्याबद्दल शुभकामना दिल्या. कार्यक्रमाचे संचालन कु. कांचन माटे व कु. प्राची चौधरी यांनी आपल्या सुंदर वाणीतुन केले तसेच कु. श्रुती सोनवाने हिने सर्वांचे आभार मानले.