पोहरादेवी यात्रेसाठी सर्वांनी सहकार्य करावे-मंत्री संजय राठोड ‌

0
25
श्री क्षेत्र पोहरादेवी येथे श्रीराम नवमी यात्रा महोत्सवाच्या तयारीसाठी आढावा बैठक
वाशिम,दि.२ एप्रिल-श्री क्षेत्र पोहरादेवी येथे श्रीराम नवमी यात्रा महोत्सवाच्या अनुषंगाने आढावा बैठक आज दि.२ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आली. या बैठकीत यात्रेच्या नियोजनासंबंधी मार्गदर्शन करण्यात आले. यात्रेत सहभागी होणाऱ्या भाविकांसाठी शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, दर्शनासाठी बॅरिकेड्स, स्वच्छतागृहे, स्नानगृहे, वाहनतळ, आरोग्य पथके तसेच पूजेच्या साहित्याच्या विक्रीसाठी स्टॉल्स यांचे नियोजन कसे असावे यावर सविस्तर चर्चा झाली. तसेच, भाविकांच्या सुरक्षेसाठी पोलीस प्रशासनाने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, अशा सूचना मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी बैठकीत दिल्या.
या यात्रेला संपूर्ण महाराष्ट्रासह शेजारील राज्यांतील तीन लाखांहून अधिक भाविक दरवर्षी हजेरी लावतात. त्यामुळे “स्वच्छ यात्रा, सुंदर यात्रा आणि शुद्ध यात्रा” हे ब्रीद जोपासावे असे विशेष निर्देश संबंधित यंत्रणेला देण्यात आले.
या बैठकीला जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस, पोलीस अधीक्षक अनुज तारे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे, सार्वजनिक बांधकाम विभाग, अमरावती विभागाचे मुख्य अभियंता गिरीश जोशी, महंत सुनील महाराज, शेखर महाराज, संत सेवालाल महाराज संस्थानचे विश्वस्त गोपाल महाराज, पोहरादेवी मंदिराचे महंत भक्तराज महाराज, जितेंद्र महाराज, विश्व हिंदू परिषदेचे राजेश्वर निवल तसेच जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पोलीस कर्मचारी उपस्थित होते.