पाथरी येथे विज पडून दोघांचा मृ्त्यू

0
238

तुमसर,दि.०३ः तालुक्यातील पाथरी गावात शेतीच्या कामासाठी आलेले प्रमोद मनीराम नागपुरे (वय 42) व मनिषा भारत पुष्तोडे (वय 32) दोघेही पाऊस येत असल्यामुळे झाडाखाली बसले असतांना अचनाक विजेचा गडगडाट होऊन विज अंगावर पडल्याने यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज ३ एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास घडली. घटनास्थळी गोबरवाही पोलीस स्टेशन चे ठाणेदार शरद शेवाळे व तहसीलदार तुमसर दाखल होत पाहणी केली.