नागपूर परिमंडलात एका वर्षात 71 हजारांहून अधिक नवीन विज जोडण्या!

0
23

नागपूरदि. एप्रिल 2025: महावितरणच्या नागपूर परिमंडलाने मागील आर्थिक वर्षात (2024-25) नवीन वीज जोडणी देण्यात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. नागपूर परिमंडलात तब्बल 71 हजार 233 नवीन लघुदाब वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत.

यापैकी तब्बल 57 हजार 858 घरगुती, 8 हजार 907 वाणिज्यिक, 1 हजार 23 औद्योगिक आणि 1 हजार 556 कृषी जोडण्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशनसाठीही 65 नवीन जोडण्या देण्यात आल्या आहेत. याशिवाय, 59 पोल्ट्री, 12 पॉवरलुम, 10 शितगृह, 413 सार्वजनिक सेवा, 128 सार्वजनिक पाणी पुरवठा, 154 पथदिवे आणि 1 हजार 48तात्पुरत्या वीज जोदण्या दिल्या आहेत.

ग्राहकसेवा अधिक गतिमान करण्यासाठी नवीन वीजजोडणी तत्काळ उपलब्ध करून देण्यासाठी ‘महावितरण’चे अध्यक्ष आणि संचालक व्यवस्थापकीय लोकेश चंद्र यांनी नवीन वीज जोडण्यांचा वेग वाढविण्यावर भर दिला आहे.. महावितरणच्या नागपूरचे परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक परेश भागवत यांच्या मार्गदर्शनात आणि मुख्य अभियंता दिलीप दोडके यांच्या नेतृत्वात नागपूर परिमंडलात ‘इज ऑफ़ लिव्हींग’ या संकल्पनेनुसार वीज ग्राहकांना तातडीने सेवा दिल्या जात आहेत. यापुर्वीही महावितरणने परिमंडलात वार्षिक सरासरी साठ ते सत्तर हजार वीजजोडण्या दिल्या गेल्या, मागिल आर्थिक वर्षात नवीन वीजजोडण्या देण्याच्या कामाचे सुक्ष्म नियोजन करण्यात आल्याने 2024-25 या आर्थिक वर्षात  तब्बल 71 हजार 233 नवीन वीजजोडण्या देण्यात आल्या आहेत.

नियमित आढावा

नव्या जोडण्यांसाठी आवश्यक वीजमीटरचा तत्काळ पुरवठा करण्यासाठी ‘महावितरणचे संचालक (संचलन) अरविंद भादीकर, नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक परेश भगवत आणि नागपुर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके नियमितपणे विभागनिहाय आढावा घेतात. त्यामुळे नवीन वीजजोडणी देण्याच्या प्रक्रियेचा वेग कायम राहिला आहे. 1 एप्रिल 2024 ते 31 मार्च 2025 या कालावधीत 71 हजार 233 नवीन वीजजोडण्या देण्यात आल्या.

नागपूर परिमंडल अंतर्गत यापूर्वी दरमहा सरासरी 5 ते 6 हजार नवीन वीज जोडण्या देण्यात येत होत्या. हा वेग गेल्या आर्थिक वर्षात (2024-25) दरमहा कायम ठेवला आहे. मागिल आर्थिक वर्षात 71 हजारांहून अधिक नवीन वीजजोडण्या देण्याची नागपूर परिमंडलाची कामगिरी आनंददायी आणि समाधान देणारी आहे. हा वेग आणखी वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. कृती मानकांनुसार वेळेत सेवा देण्यासाठी महावितरणचे सर्व अभियंता, अधिकारी आणि कर्मचारी कटिबद्ध असल्याची ग्वाही नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी दिली.

वर्गवारी नुसार नवीन वीज जोड

वर्गवारी नागपूर ग्रामीण मंडल नागपूर शहर मंडल वर्धा मंडल नागपूर परिमंडल एकूण
घरगुती 14,608 35,194 8,056 57,858
वाणिज्यिक 1,780 5,411 1,716 8,907
औद्योगिक 399 443 181 1,823
कृषी 728 82 7,46 1,556
ई वाहन चार्जिंग 12 40 13 65
इतर 588 894 342 1,824
एकूण 18,115 42,064 11,054 71,233