..श्रीरामनवमीच्या पावन अवसरावर 1221 घटांचे विसर्जन, उत्साहात साजरा होणार राम जन्मोत्सव
गोंदिया : श्री सूर्यदेव मांडोदेवी देवस्थान बघेडा/तेढा यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही दिनांक 6 एप्रिल 2025 रोजी रामनवमीच्या पावन अवसरावर सर्वजातीय सामूहिक विवाहाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात नियोजित संख्येपेक्षा अधिक म्हणजेच 135 सर्वजातीय जोडपी माता मांडोदेवीच्या आशीर्वादाने विवाहबंधनात अडकणार आहेत.
संस्थेचे अध्यक्ष व आमदार विनोद अग्रवाल यांनी सांगितले की, 6 एप्रिल रोजी राम जन्मोत्सवाच्या पावन अवसरावर दुपारी 12 वाजता भगवान श्रीरामाचा जन्मोत्सव साजरा केला जाईल. संध्याकाळी 5 वाजता मांडोदेवी देवस्थानमध्ये ठेवलेले 1221 घटांचे विसर्जन करण्यात येईल. त्यानंतर संध्याकाळी 6 वाजता सर्वजातीय सामूहिक विवाह सोहळ्यास सुरुवात होईल.
संस्थेचे अध्यक्ष आणि आमदार विनोद अग्रवाल यांनी सांगितले की, सर्वजातीय सामूहिक विवाह उपक्रम 1993 पासून सुरू आहे आणि यंदाचे हे सलग 33 वे वर्ष आहे. दरवर्षी नवविवाहित दाम्पत्यांना विवाहानंतर आवश्यक जीवनावश्यक वस्तू, कपडे आणि सोन्याचे मंगळसूत्र प्रदान केले जाते. मध्य भारतातील हे पहिले धार्मिक पर्यटन स्थळ आहे, जिथे वेळ आणि पैशांची बचत लक्षात घेऊन सर्वजातीय सामूहिक विवाहाचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
या श्रीराम जन्मोत्सव, रामनवमी आणि सामूहिक विवाह सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष आमदार विनोद अग्रवाल, सचिव जिल्हा परिषद सदस्य डॉ. लक्ष्मण भगत, उपाध्यक्ष भैयालाल सिंदराम, कोषाध्यक्ष विश्वनाथ असाटी, सहसचिव कुशनजी घासले, सदस्य डॉ. जितेंद्र मेंढे, शालिकराम उईके, सखाराम सिंदराम, दिलीप खंडेलवाल, राहुल अग्रवाल, नंदकिशोर गौतम आणि मंदिराचे पुजारी पंडित अयोध्यादास महाराज यांनी केले आहे.