सर्वांसाठी घरे हे धोरण शासनाने सत्यात उतरवले – लायकराम भेंडारकर

0
48

प्रधानमंत्री आवास योजनेत राज्याकडून ५० हजाराची अतिरिक्त वाढ

अर्जुनी-मोर.-घरकुलांसाठी जागा नसलेल्या लाभार्थ्यांना शासनाच्या पंडित दीनदयाल योजनेअंतर्गत जागा खरेदीकरिता एक लाख अर्थसहाय्य शासकीय अनुदान,तर घरकुल बांधकामाकरिता प्रधानमंत्री आवास योजनेत तब्बल ५० हजाराची अतिरिक्त वाढ करून गोरगरीब व सामान्य जनतेचे घराच स्वप्न सत्यात उतरवलेच पण घरात विजेची समस्याही होणार नाही यासाठी सौर उर्जा यंत्रणा देऊन मोठी समस्या मिटवली त्यामुळे लायार्थ्यानी ताबडतोब मंजूर घरकुलाचे बांधकाम पूर्णं करण्याचे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी केले.
ते पुढे म्हणाले की ,सर्वांसाठी खरे हे केंद्र शासनाचे धोरण आहे. ग्रामीण भागात केंद्र आणि राज्य शासनाच्या वतीने ६० व ४० टाक्याच्या धर्तीवर घरकुल अभियान राबविण्यात येत आहेत. राज्यातील बेखर तसे कच्च्या घरात वास्तव्य करणाऱ्या पात्र लाभार्थ्यांना स्वतःचं घर मिळावं यासाठी राज्य व केंद्र शासन प्रयत्न करत आहे. अनुसूचित जाती व नवबौद्धांसाठी रमाई आवास योजना अनुसूचित जमाती करिता शबरी आवास योजना व आदीमा आवास योजना विमुक्त जाती भटक्या जमातीकरिता यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना इतर मागासवर्ग प्रवर्गाकरिता मोदी आवास योजना इत्यादींचा समावेश आहे.
“ घरकुलाचे बांधकाम करत असताना लाभार्थ्यांना बरीच आर्थिक दमछाक करावी लागते. त्यामुळे वाढलेली महागाई आणि घरकुल बांधकाम साहित्यात वाढलेले दर लक्षात घेऊन राज्य शासनाने आपल्या हिश्यातील ग्रामीण टप्पा २ करिता ५० हजार रुपये इतकी अतिरिक्त वाढ मंजूर केली आहे. या ५० हजारातून बांधकामा करिता ३५ हजार तर १५ हजार रुपये प्रधानमंत्री सूर्यघर योजने अंतर्गत छतावर १ केव्ही मर्यादा पर्यंतचे सौर यंत्र उभारण्यासाठी मंजूर केले आहेत. जे लाभार्थी सौर यंत्रणा उभारणार नाहीत त्यांना १५ हजार रुपये मिळणार नसल्याची माहिती ता.०४ रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयात स्पष्ट केली आहे.