केशोरी येथे राष्ट्रीयकृत बँकेची शाखा स्थापन करा:- जि प सदस्य श्रीकांत घाटबांधे

0
59

अर्जुनी/मोर– गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील शेवटच्या टोक म्हटले तर केशोरी हा प्रमुख गाव आहे आणि हा परिसर नक्षलग्रस्त व आदिवासी बहुल क्षेत्र असलेल्या केशोरी गावात राष्ट्रीयकृत बँकेची भारतीय स्टेट बँकेची शाखा स्थापन करण्यात यावी अशी मागणी केशोरी क्षेत्राचे जिल्हा परिषद सदस्य श्रीकांत घाटबांधे यांनी शासनाकडे केली आहे.केशोरी हे गाव परिसरातील 40 ते 50 गावांची मुख्य बाजारपेठ असुन केशोरी परिसर आर्थिक दृष्ट्या मागास असून या परिसरातील नागरिकांना शासनाच्या अनेक योजनेच्या लाभासाठी या भागातील नागरिकांना बँकिंग सेवा मिळवण्यासाठी 30 ते 40 किलो मीटर अंतरावर असलेल्या तालुका मुख्यालय गाठावे लागते.शासनाच्या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी शासनाने राष्ट्रीयकृत बँकेचे खाते अनिवार्य केल्यामुळे या भागातील शालेय विद्यार्थी,शेतकरी,आदिवासी, निराधार,श्रावणबाळ,पिएम किसान योजनेचा लाभ यासह अन्य योजनेचा लाभ घेण्यासाठी तसेच सामान्य नागरिकांना आर्थिक व्यवहार करताना अनेक अडचणी निर्माण होतात. त्यासाठी केशोरी येथे राष्ट्रीयकृत भारतीय स्टेट बँकेची शाखा उघडण्यात यावी असी मागणी जि.प.सदस्य श्रीकांत घाटबांधे यांनी संबंधित विभाग व शासनाकडे केली आहे.