पी डी रहांगडाले विद्यालय, गोरेगाव येथे बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

0
227

गोरेगाव | दिनांक: १४ एप्रिल २०२५
पी डी रहांगडाले विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय,गोरेगाव येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य सी डी मोरघडे होते. कार्यक्रमाची सुरुवात बाबासाहेबांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दीपप्रज्वलनाने करण्यात आली.
या प्रसंगी विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांच्या जीवनावर आधारित भाषणे, नृत्य, गीत आणि नाट्यछटा सादर करून उपस्थितांचे मन जिंकले. त्यांच्या विचारांचा प्रसार करताना विद्यार्थ्यांनी “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” या बाबासाहेबांच्या मूलमंत्रावर भर दिला.
प्राचार्य श्री. सी डी मोरघडे यांनी आपल्या भाषणात डॉ. आंबेडकरांचे संविधान निर्मितीतले योगदान, त्यांच्या सामाजिक न्यायासाठी केलेल्या लढ्याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शिक्षकांनी देखील आपले मनोगत व्यक्त करत बाबासाहेबांचे कार्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवले.
कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली. संपूर्ण वातावरणात देशभक्ती आणि अभिमानाचे भाव निर्माण झाले होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पर्यवेक्षक ए एच कटरे, प्रा. सी आर बिसेन, प्रा. डी बी चाटे, प्रा. डी एम राठोड, प्रा ए जे सोरले, आर टी पटले, वाय के चौधरी,आर वाय कटरे, एस आर रहांगडाले,आय बी पटले,एम डी रहांगडाले,ए एस बावनथडे, एस जी दमाहे, प्रा. जे वाय बिसेन, झेड जे भोयर, बी बी रहांगडाले,अभय रहांगडाले, शिला येळणे यांनी सहकार्य केले.