अर्जुनी मोरगाव,दिनांक १४- तालुक्यातील वडेगाव बंध्या येथे पंचशील बौद्ध समाजाच्या वतीने क्रांतीसुर्य महात्मा फुले व विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित भिमदास नाईक यांच्या कव्वाली च्या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष इंजि यशवंत गणविर यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा परिषद सदस्य श्रिकांत घाटबांधे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
यावेळी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना म्हणाले की,स्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे क्रांतीसुर्य महात्मा फुले व विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त आपण समाज बांधव व गावकरी मंडळींनी समाजप्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित केला.सर्वप्रथम आपलं अभिनंदन करतो.आपण दरवर्षी जयंती पुण्यतिथी असे विविध कार्यक्रम आयोजित करत असतो परंतु त्या दिवसापुरता मर्यादित न राहता आपल्या जीवनात महामानवांच्या विचारांची ज्योत तेवत ठेवावी,कारण महामानवांचे विचार आपल्या जीवनातील अंधकार दूर सारुन सरळ मार्गाने चालण्यास प्रवृत करतात आणि आपल्या पावलावर पाऊल ठेवत आपली भविष्याची पिढी सुद्धा सुजाण सुशिक्षित व सुसंस्कृत घडेल.
पुढे बोलताना म्हणाले की, आजच्या या मंगलमय दिनी आपणास सर्वाकडुन एकच अपेक्षा बाळगतो की आपण आपल्या पाल्यांना चांगले दर्जेदार गुणात्मक शिक्षण घेण्यासाठी प्रवृत करावे कारण आपले पाल्य उद्या देशाची धुरा समर्थपणे साभाळतील.असे आवाहन केले.
या कार्यक्रमाला दानेश साखरे सभापती नगरपंचायत, सरपंच घनश्याम शहारे, पंचायत समिती सदस्य फुलचंद बागडेरीया, घनश्याम धामट, इंजि आनंद चंद्रिकापुरे, प्रशांत शहारे, योगेश नाकाडे, मिथुन मेश्राम, मिथुन टेंभुर्णे व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.