सामाजिक न्याय पर्व कार्यक्रमांतर्गत डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

0
39

गोंदिया,दि.1६: सामाजिक न्याय  विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती, नुसूचित जमाती   वंचित दुर्बल  घटकातील व्यक्तींच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय साध्य करण्यासाठी राज्य शासनाकडुन विविध कल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेला व्हावी तसेच जनतेत जनजागृती निर्माण व्हावीया उद्देशाने दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुध्दा दि.8 एप्रिल ते 14 एप्रिल 2025 या कालावधीत राज्यात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह” तसेच दि.11 एप्रिल ते 1 मे 2025 या कालावधीत सामाजिक न्याय पर्व हे कार्यक्रम साजरे करण्यात करण्यात येत आहेतसदर कालावधीमध्ये विविध उपक्रम/कार्यक्रम/स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहेत.

         त्या अनुषंगाने दि.14 एप्रिल 2025 रोजी सकाळी 8.00 वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृहफुलचुरगोंदिया येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस माल्यार्पन  अभिवादन करुन जयंती साजरी करण्यात आलीतसेच फुलचुर नाकागोंदिया ते डॉबाबासाहेब आंबेडकर चौकगोंदिया पर्यंत मागासवर्गीय वसतीगृहातील प्रवेशित विद्यार्थी वविद्यार्थीनी तसेच उपस्थित कर्मचारी वर्ग यांची डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जयघोष करत प्रभातफेरी काढण्यात आलीसदर प्रभातफेरीला समाज कल्याण सहायक आयुक्त विनोद मोहतुरे  यांनी हिरवी  झेंडी  दाखवून सुरुवात केलीतसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक स्थित भारतरत्न डॉबाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस माल्यार्पन  अभिवादन केले.

      तसेच दुपारी 12.00 वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनगोंदिया येथील सांस्कृतिक सभागृहात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होतेसदर कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम.मुरुगानंथम, तसेच प्रमुख अतिथी म्हणून सामाजिक कार्यकर्ते शुध्दोदन सहारेजेष्ठ नागरीक सेवा संघ अध्यक्ष श्री.जमईवार, सचिव श्रीबुध्दे, सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी सिध्दार्थ मेश्राम , एस.एस.गर्ल्स कॉलेजच्या प्राध्यापिका दिशा गेडाम, नवनियुक्त न्यायाधीश स्नेहा मेश्राम प्रामुख्याने उपस्थित होतेसदर कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमांना माल्यार्पण  दिप प्रज्वलन करुन करण्यात आली.

       यावेळी उपस्थित वक्त्यांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक, राजकीयआर्थिकसांस्कृतिक  शैक्षणिक कार्याबाबत विस्तृत मार्गदर्शन केलेयाप्रसंगी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंती निमित्त सामाजिक न्याय विभागाच्या कन्यादान योजनामीनी ट्रॅक्टर योजनाकर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभीमान  सबळीकरण योजनास्वाधार योजना या योजनेंतर्गत लाभार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देवून सत्कार करण्यात आला.

        कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाज कल्याण सहायक आयुक्त विनोद मोहतुरे यांनी केलेसुत्रसंचालन  समाज कल्याण  निरिक्षक स्वाती कापसे यांनी  केले तर उपस्थितांचे आभार आशिषकुमार जांभुळकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या  यशस्वितेकरीता  समाज कल्याण निरिक्षक राजेश मुधोळकरमनिषा टेंभुर्णेअजय प्रधानपुष्पलता धांडेयोगेश हजारेमानिकराव ईरलेगिरीधर गोबाडेहेमंत घाटघुमर, पंकज काळेलक्ष्मण खेडकरशैलेश उजवने तसेच एस2बीव्हीजीक्रिस्टल लिमिटेड बाह्यस्त्रोत कंपनीचे कार्यरत कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.