बहुजनानो सत्ता हस्तगत करा-डॉ. विलास खरात यांचे आव्हान

0
35

**डॉ. आंबेडकर जयंती उत्साहात*

*सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्कार*
गोंदिया ता. १६ :-देशात बहुजन समाज पक्षाचे सरकार स्थापन झाल्यास आपली बरीगत नाही,म्हणून बहुजणांना सत्तेपासून वंचित करण्यासाठीच काँग्रेसने इव्हिएम चा डाव खेळला, परंतु बहुजणानो या देशाची सत्ता हस्तगत करा असे आवाहन महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाचे राष्ट्रीय संयोजक, इतिहासकार डॉ विलास खरात यांनी (ता. 14) केले, डॉ खरात हे डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या 134 व्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्य वक्ते म्हणून मार्गदर्शन करीत होते.हा कार्यक्रम डॉ बाबासाहेब आंबेडकर सार्व. जयंती उत्सव समितीच्या वतीने येथे आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जयंती समितीचे अध्यक्ष अनंत टेम्भूरकर हे होते.मंचावर उत्तर प्रदेशच्या बनारस हिंदू विद्यापीठाचे प्राध्यापक डॉ महेश अहिरवार आणि भाईचारा कमेटीचे सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
डॉ खरात पुढे बोलताना म्हणाले की, महाबोधी महाविहार ही चक्रवर्ती सम्राट अशोकांची विरास्त असून बौद्धांची भावना आणि त्यांच्या अस्मितेचा प्रश्न बनला आहे.महाबोधी महाविहार बौद्धांना स्वाधीन करणे,तसेच 1949 चा काळा कायदा बी. टी. ऍक्ट रद्द करणे आदि आमच्या मागण्या सरकारने मान्य
केल्या नाही तर, प्रसंगी 29 जून रोजी भारत बंद करण्यात येनार असल्याचा इशारा डॉ खरात यांनी दिला.
या प्रसंगी बोलताना प्रा. अहिरवार म्हणाले की,
डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेचे विविध पैलू आहेत. बहिस्कृत हितकारिणी सभा, मजूर पक्ष, मूक नायक, प्रबुद्ध भारत यामुळे बहुजनात सामाजिक जनजागृती निर्माण झाली. भारतीय संविधानाने सामाजिक विषमता नष्ट केली. उद्योग, व्यापार सहकारिता साधन संपत्ती मध्ये भागीदारी दिली, आणि भारत बौद्धमय करण्याचा बाबासाहेब आंबेडकरांनी प्रण केला यामुळे आमची मोठी प्रगती झाली. आम्ही झोपडीतून महालात आलो, सुशिक्षित झालो अगदी हेच शल्य मनुवाद्याना बोचले, परिणामी त्यांचे पोटात दुखू लागल्यामुळे आता शिक्षण आणि सत्ता यापासून बहुजनांना दूर करण्यासाठी त्यांचे जबरदस्त प्रयत्न सुरु आहेत, मनुवाद्यांचे हे प्रयत्न हाणून पाडा असे आवाहन त्यांनी केले.
याप्रसंगी विविध समाजातील सामाजिक कार्यकर्ते हेमलता आहाके,गिन्नी करियार,डॉ प्रदीप रोकडे, राजू गौनधरे, विनोद गोटे, प्रभू नेवारे,विजय चन्ने, आर. डी. कटरे,देवचंद खोब्रागडे, क्रांतिकुमार ब्राह्मणकर,मुस्ताक तिगाला, अनिल बावणे,ऍड सुशील यादव,विकास बंजारे, नितीन राऊत,भंडारी चौधरी,दीपक कन्नोजिया,दयानंद चाटे, दिलीप पारधी, नितेश बागडे आदी मान्यवरांना पाहुण्यांचे हस्ते पुष्पगुच्छ, स्मृतिचिन्ह आणि महात्मा फुले लिखित गुलामगिरी हा ग्रंथ प्रदान करण्यात आला.
महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या तैलचित्राला माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.छत्तीसगडच्या संगित कार्यक्रमाणे श्रोते मंत्रमुग्ध झाले होते. तत्तपूर्वी रामनगर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला अभिवादन करून शहरात मिरवणूक काढण्यात आली. उल्लेखनीय असे की महाबोधी महाविहाराच्या मुक्ती साठी हस्ताक्षर अभियान राबविण्यात आलं.समितीचे अध्यक्ष श्री टेम्भूरकर यांनी अध्यक्षीय भाषण केलं. सुनील भरणे आणि डॉ राजेश उके यांनी संचालन केलं.महासचिव अरविंद भावे यांनी प्रास्ताविक करून एन. एल. मेश्राम यांनी सर्वांचे आभार मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गेल्या अडीच महिन्यापासून कार्यकर्त्यांनी अहोरात्र मेहनत घेतली. यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता.