चंद्रपूर,दि.१७ः तीन गावकऱ्यांचा बळी घेणाऱ्या वाघाला जेरबंद करण्यात चंद्रपूर वनविभागाला यश आले असून या वाघाची रवानगी गोरेवाडा येथे करण्यात येणार आहे. उत्तर ब्रम्हपूरी वनक्षेत्रातील चिचखेडा बिटात दुपारी साडेबाराच्या सुमारास ‘टी-३’ वाघाला जेरबंद करण्यात आले. या वाघाला जेरबंद करण्यात आल्याने परिसरातील गावकऱ्यांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.
ब्रम्हपूरी नवविभागअंतर्गत नवेगाव/आवळगाव उपक्षेत्र परिसरात ‘टी-३’ वाघाचे वास्तव्य होते. या वाघाकडून परिसरात सातत्याने गावकऱ्यांवर, जनावरांवर हल्ले होत होते. त्यामुळे मानवी जिवितास धोकादायक ठरलेल्या या वाघाला जेरबंद करण्याची परवानगी ब्रम्हपूरी उपवनसंरक्षक व प्रादेशिक मुख्य उपवनसंरक्षक यांनी प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) एम. श्रीनिवास राव यांच्याकडे केली.
.