गोंदिया,दि.१९ : फायर सुरक्षा सप्ताहअंतर्गत गुरुवारी (दि.१७) स्थानिक जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे फायर सुरक्षाचे नियम कसे पाळावेत, अपघात होऊ नये यासाठी काय काळजी घ्यावी याबाबत विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. यावेळी काही विद्यार्थ्यांनी अदानी फायर सुरक्षा यंत्रणेला प्रश्न विचारून माहिती जाणून घेतली. फायर अपघाताला आळा बसावा व विद्यार्थ्यांमध्ये फायर सेफ्टी संबंधी जनजागृती होण्याकरिता दरवर्षी संपूर्ण फायर सुरक्षा अभियान आयोजित करण्यात येते. यानिमित्त अदानी फाऊंडेशन हा कार्यक्रम घेण्यात आला. अदानी फाऊंडेशनचे अधिकारी राहुल यांनी आपल्या आजूबाजूला अनेकदा आगीच्या घटना घडतात. कधी सिलेंडरचा स्फोट होतो तर कधी शॉट सर्किटमुळे इमारतीला, घराला आग लागते. अशा वेळी अनेकदा आपल्याला नेमकं आधी काय करावं हे सुचत नाही. अशा वेळी तुम्ही या टिप्सचा नक्कीच वापर करू शकता आणि स्वतःबरोबरच इतरांचा जीवदेखील वाचवू शकता या प्रकारे फायर सेफ्टी टीमने मार्गदर्शन केले व खालील प्रात्यक्षिक करून सेफ्टी टिप्स सांगितले व फायर सुरक्षा मुद्द्यावर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमासाठी जी. एच. रहांगडाले, पी. एस. रहांगडाले, रक्षिता मेश्राम, उर्मेंद्र रहांगडाले, के. जी. आगाशे, बी. पी. कापगते, अनिल नेरकर, हेमंत रहांगडाले, वैशाली जांभूळकर, एस. डी. पटले, अरविंद ठाकरे, विनोद हरिणखेडे, आर. दमाहे, बी. बीजेवार, आर. डी. सारंगपुरे, आर. डी. घरजारे, भारती रोकडे, स्मिता पोलशेट्टीवार, अर्चना मोहारे, एस. ए. चव्हाण, देवा वरठे, मीना खंगारकर यांनी सहकार्य केले.