उमरझरी लघु प्रकल्पाच्या कालवा सुधारणा कामांचे भूमिपूजन आमदार बडोलेंच्या हस्ते

0
56

सडक अर्जुनी,दि.१९ः– महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रमांतर्गत उमरझरी लघु प्रकल्पातील मुख्य कालवा प्रणालीच्या सुधारणा कामाचे भूमिपूजन आमदार तथा माजी मंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते पार पडले.या प्रकल्पासाठी एकूण १४ कोटी ३१ लक्ष निधी मंजूर असून, या अंतर्गत उमरझरी मुख्य कालवा विमोचकाजवळ, चिरचाळी, कोहळीटोला, वडेगाव, बोथली आणि घाटबोरी या सात लघु कालव्यांची सखोल सुधारणा करण्यात येणार आहे. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना वेळेवर व पर्याप्त पाणी उपलब्ध होणार असून, शेती उत्पादनात मोठी वाढ होण्यास मदत होईल.

कार्यक्रमात बोलताना आमदार राजकुमार बडोले यांनी सांगितले की, या कामांसाठी यंत्रणेला अपेक्षेप्रमाणे कालावधी कमी मिळणार आहे, त्यामुळे ग्रामस्थांनी सहकार्य करावे. सर्व कामे गुणवत्तापूर्ण व्हावीत यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष द्यावे. त्यांनी या सुधारणा कामांबाबत सविस्तर मार्गदर्शनही केले. तसेच या उपक्रमामुळे सिंचन क्षमतेत लक्षणीय वाढ होईल व पाणीपुरवठा अधिक प्रभावी आणि कार्यक्षम पद्धतीने होईल असेही स्पष्ट केले.

या कार्यक्रमास पंचायत समिती सभापती चेतन वळगाये, कृ.उ.बा.स. सभापती डॉ. अविनाश काशिवार, जिल्हा परिषद सदस्या कविता रंगारी, जि.प. सदस्य डॉ. भुमेश्वर पटले, कार्यकारी अभियंता सोनाली सोनुले, माजी उपसभापती तथा पं.स. सदस्य शालिंदर कापगते, पं.स. सदस्य अलाउद्दीन राजानी, पं.स. सदस्य वर्षा शहारे, उपविभागीय अभियंता समीर बनसोडे व कदम, माजी सरपंच परमानंद बडोले, घाटबोरी सरपंच देवानंद वंजारी, गुड्डू डोंगरवार, महिपाल बडोले, चरणदास शहारे, अपूर्वा कोटांगले, कनिष्ठ अभियंता दिपक भोई, रवी पटले, कालवा निरीक्षक सरयु बनसोड, बागडे, जाधव, स्थापत्य सहायक अभियंता उइके, रामु लांजेवार, कालवा मोजणीदार विकलेश्वर मेश्राम यांच्यासह पाटबंधारे विभागाचे अधिकारी आणि परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.