तुमसर : तालुक्यातील नाकाडोंगरी वनपरीक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या जंगलव्याप्त चिखला येथे १७ एप्रिल रोजी रात्रीच्या दरम्यान एका पट्टेदार वाघिणीने शिकारीसाठी जंगलातील रानडुकरांचा पाठलाग करीत असतांना रानडुकरासह वाघीणीचा येथिल कवल बाबुराव धुर्वे नामक शेतकर्यांच्या खाजगी शेतातील गट क्रमांक १२२ मधील विहीरीत पडून मृत्यू झाल्याची घटना १८ एप्रिल रोजी सकाळी ७.३० वाजता उघडकीस आली.
चिखला येथिल शेतकरी कवल धुर्वे हे सकाळी आपल्या शेतावर गेले असता त्यांना त्यांच्या शेतातील विहीरीतील पाण्यात पट्टेदार वाघीण व रानडुक्कर मृतावस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. सदर वाघीण ही वयस्क असुन सहा ते सात वर्षाची होती अशी माहिती आहे. (Tiger Attack )दरम्यान शेतकरी कवल धुर्वे यांनी सदर घटनेची माहिती नाकाडोंगरी वनपरीक्षेत्र कार्यालयाला दिली असता. येथिल वनकर्मचारी घटनास्थळी दाखल होत घटनास्थळाचा पंचानामा करून सदर मृतावस्थेत असलेली वाघिन व रानडुक्कराचे शव वनकर्मचार्यांनी बाहेर काढले. दरम्यान वाघीणीचे ाुर्ण अवयव शाबुत असल्याची खात्री करण्यात आली.