25 जलस्त्रोतांचे ओटी परिक्षण
27 आरोग्य कर्मचार्यांनी यात्रे दरम्यान भाविकांना दिली आरोग्य सेवा
तिरोडा,दि.२१ः- तालुक्यातील सुकडी डाक येथे चैत्र पौर्णिमेच्या पर्वावर श्री क्षेत्र चक्रधर स्वामींची यात्रा महोत्सव दि. 15 ते 20 एप्रिल या कालावधीत संपन्न झाली.या यात्रेत विविध धार्मिक कार्यक्रम, भजन, कीर्तन, महाआरती,महाप्रसाद व सामुहिक विवाह यांचा समावेश होता.त्या अनुषंगाने यात्रेत येणाऱ्या भाविकांना आरोग्य सेवा पुरविण्यात आल्याची माहीती तिरोडा तालुका आरोग्य अधिकारी डॉ.दर्शना नंदागवळी यांनी दिली आहे.
सुकडी डाक येथे येथे दि.15 ते 20 एप्रिल या कालावधीत चैत्र पौर्णिमेनिमित्त यात्रा भरत असते.या यात्रेत विविध धार्मिक कार्यक्रम, भजन, कीर्तन, महाआरती,महाप्रसाद व सामुहिक विवाह यांचा समावेश असतो.श्रीक्षेत्र चक्रधर स्वामी यात्रेला संपूर्ण विदर्भातूनच नव्हे,तर मध्यप्रदेश येथूनही मोठ्या संख्येने भाविक येतात. दूरवरून येणारे भाविक सहा दिवस चालणाऱ्या यात्रेला आवर्जून भेट देतात.दरवर्षी या ठिकाणी हजारो भाविक गर्दी करुन दर्शन घेत असतात.त्या भाविकांना सर्व विभागांच्या एकत्रित प्रयत्नाने पुरेशा सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत असते.
यात्रेदरम्यान ग्रामीण भागातील आदिवासी जनतेला वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हाव्यात या हेतूने प्राथमिक आरोग्य केंद्र सुकडी डाक येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.शिवकुमार हरिणखेडे यांच्या नियोजनानुसार उपलब्ध वैद्यकिय अधिकारी,समुदाय आरोग्य अधिकारी,आरोग्य सहाय्यक,फार्मासिस्ट,आरोग्य सेवक,आरोग्य सेविका,आशा सेविका व परिचर यांचे दिवसरात्र पाळीत वैद्यकिय पथक कार्यांन्वित करुन मंदिराच्या मध्यवर्ती भागात आरोग्य शिबीर व जनजागृती स्टॉलचे आयोजन करण्यात आले होते.458 लोकांना प्रथमोपचार केले असल्याची माहीती प्राथमिक आरोग्य केंद्र सुकडी डाक येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.शिवकुमार हरिणखेडे यांनी दिली आहे.
आरोग्य शिबीराच्या माध्यमातुन आरोग्य सेवा व जनजागृती वर विशेष भर आली. आरोग्य शिबीराच्या ठिकाणी आरोग्य शिक्षण विषयी प्रदर्शनी,मेडीक्लोर,ओ.आर.एस.पा
तसेच सहा दिवशी सकाळ, दुपार व सांयकाळी आरोग्य सेवक,जलसुरक्षक यांच्या मदतीने पिण्याच्या पाण्याचे ओटी तपासणी व जलशुद्धीकरण करुन क्लोरिनेशन करण्यात आले होते.भाविकांसाठी भक्तनिवास,हॉटेल,पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांचे असे एकुण 25 जलस्त्रोतांचे ओटी तपासणी करण्यात आले होते.
तसेच यात्रेदरम्यान दि.15 ते 20 एप्रिल या सहा दिवसाच्या कालावधीत तालुका आरोग्य अधिकारी यांचे सह वैद्यकीय अधिकारी दिवस रात्र भेट देवुन पाहणी करण्यात व्यस्त होते.
प्राथमिक आरोग्य केंद्र सुकडी डाक येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.शिवकुमार हरिणखेडे, डॉ.स्नेहा दोनोडे,डॉ.प्रीती वालके यांचे मार्गदर्शनात समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.नमिता गौतम,डॉ.रोहित हरीणखेडे,डॉ.अशोक भगत,डॉ.निशांत डहाटे यांनी रुग्ण तपासणी केली. आरोग्य सेवक जिलानी कागदी,व्हि.ए.डहारे,राहुल तिरकुले,एम.एस.क्षिरसागर एस.एच.पुगळे यांचे सह आरोग्य सेविका दिपाली ठवकर,डी.वाय.पटले,तारा तितिरमारे,शोभा राठोड,पि.टी.नैकाने व श्रद्धा बोरकर सोबत परिचर पिंपळकर,कळाम व गणवीर यांनी रुग्ण नोंदणी केली.स्वच्छक गुनेरिया यांनी स्वच्छ्तेविषयी मोलाची कामगिरी केली तसेच वाहन चालक भुषण उईके,आरोग्य सहाय्यिका सी.बी.घाबर्डे,आरोग्य सहाय्यक विजय मेश्राम,फार्मासिस्ट सुनील भोले यांनी विशेष आरोग्य सेवा दिल्याने यात्रेदरम्यान मध्ये कुठलेही विघ्न आले नाही. 27 आरोग्य कर्मचारी यांनी यात्रे दरम्यान दिवसरात्र एक करुन भाविकांना आरोग्य सेवा दिली असल्याची माहीती वैद्यकीय अधिकारी डॉ.शिवकुमार हरिणखेडे यांनी या प्रसंगी दिली आहे.
दि.15 ते 20 एप्रिल या सहा दिवसाच्या कालावधीत तालुका आरोग्य अधिकारी तिरोडा यांचे पथक व प्राथमिक आरोग्य केंद्र सुकडी डाक येथील अधिकारी व कर्मचारी त्यात वैद्यकीय अधिकारी,समुदाय आरोग्य अधिकारी,फार्मासिस्ट,आरोग्य सेवक,आरोग्य सेविका,आरोग्य सहाय्यक,आरोग्य सहायिका,परिचर,जलसुरक्षक,वाहन चालक,स्वच्छक व आशा सेविका यांनी यात्रेदरम्यान उत्तम आरोग्य सेवा दिल्याबद्दल तिरोडा तालुका आरोग्य अधिकारी डॉ.दर्शना नंदागवळी यांनी सर्वांचे कौतुक केले आहे.