*दहशतवादी हल्ल्यात ठार झालेल्या नागरिकांना वाहिली श्रध्दांजली : दहशतवाद्यांवर कठोर कारवाई करा, राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी*
गोंदिया : जम्मू कश्मीर खोऱ्यातील पहलगाम येथील पर्यटकावर दहशतवाद्यांनी काल २२ एप्रिल रोजी भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात २७ पर्यटकांचा मृत्यू झाला. या घटनेचा संपूर्ण देशभरातून निषेध नोंदविला जात आहे. जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज सकाळी रेलटोली राष्ट्रवादी काँग्रेस भवन ते सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्यापर्यंत निषेध मोर्चा काढून या घटनेचा निषेध नोंदविण्यात आला. तसेच दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.
जम्मू काश्मीर येथील दहशतवादी हल्ल्यात २७ पर्यटकांचा मृत्यू झाला. या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा खा. प्रफुल पटेल, माजी आ. राजेंद्र जैन यांनी निषेध नोंदविला. दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या पर्यटकांना रेलटोली येथील राष्ट्रवादी काँग्रेस भवन येथे दोन मिनिटे मौन पाळून श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या नेतृत्वात अखंड भारताचे निर्माते सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्यापर्यंत निषेध मोर्चा काढण्यात आला. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनी सहभागी झाले होते. यावेळी माजी आ. राजेंद्र जैन यांनी या भ्याड हल्ल्याचा निषेध नोंदवित दहशवाद्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
सर्वश्री राजेन्द्र जैन, विनोद हरिनखेड़े, देवेंद्रनाथ चौबे, अशोक सहारे, नानू मुदलियार, केतन तुरकर, राजु एन जैन, दिनेश अग्रवाल, प्रेम जैस्वाल, माधुरी नासरे, निर्मला मिश्रा, विनीत सहारे, हेमंत पंधरे, छोटू पंचबुद्धे, नीरज उपवंशी, अखिलेश सेठ, पूजा उपवंशी, आशा पाटिल, कुन्दा दोनोडे, रुचिता चौहान, अनिता चौरावार, दीपा काशिवार, मोनिका सोनवाने, आनंद ठाकुर, कैलाश यादव, अनुज जैस्वाल, प्रवीण बैस, झनकलाल ढेकवार, मृत्युंजय सिंग, हरगोविंद चौरसिया, जिम्मी गुप्ता, लखन बहेलिया, सौरभ जैस्वाल, रवि रामटेककर, संजीव राय, राजेश वर्मा, मयूर दरबार, चंचल चौबे, विनायक शर्मा, नागों बंसोड़, रमेश कुरील, करण टेकाम, संजू शेंडे, दुलीराम भाकरे, अशोक गौतम, सुरेश कावड़े, शैलेश वासनिक, सुनील पटले, अशोक ब्राम्हणकर, राजु गायधने, रामु चूटे, सयाराम भेलावे, सतीश बिसेन, पंकज चौधरी, राज शुक्ला, तुषार ऊके, प्रदीप लांजेवार, योगेश दरवे, प्रशांत सोनपुरे, लव माटे, कपिल बावनथड़े, दीपक मूलचंदानी, सुनील दुम्बानि, श्रेयष खोबरागड़े, आकाश वाडवे, मोंटी सुखदेवे, मुकेश भोयर, संदीप पटले, रोहित माने, प्रमोद ऊके, संदेश चौरे, शाहिल नागभिरे, भूषण पाटिल, अमन घोडीचोर, रमाकांत मेश्राम, अमित चौहान, संजीव बापट, सचिन अवस्थी, रौनक ठाकुर, जगन्नाथ ठाकरे, प्रेमलाल भेलावे, कुणाल बावनथड़े, प्रमोद कोसरकर, वामन गेडाम, नरेंद्र बेलगे सहित पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनी उपस्थित होते.