“चला हिवतापाला संपवू या:पुन्हा योगदान द्या,पुनर्विचार करा,पुन्हा सक्रिय व्हा…”-जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन वानखेडे

0
16

जागतिक मलेरिया दिन 25 एप्रिल च्या अनुशंगाने खास लेख
मलेरिया हा एक जिवघेणा आजार, प्रतिबंध हाच पर्याय
ह्या वर्षीचे घोषवाक्य
”    : , ,  ”

मलेरिया हा डासांच्या चावण्यामुळे होणारा रोग आहे. जागतिक स्तरावर दरवर्षी मलेरिया दिन 25 एप्रिल रोजी मलेरिया नियंत्रित करण्यासाठी पाळण्यात येतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या 60 व्या सत्रामध्ये मे 2007 मध्ये हा दिन पाळण्याचा निर्णय घेण्यात आला. मलेरियाचे गांभीर्य लक्षात घेता 25 एप्रिल हा ‘जागतिक मलेरिया दिन’ म्हणून ओळखला जातो. जागतिक आरोग्य संघटनेमार्फत प्रत्येक वर्षी एक घोषवाक्य देवुन लोकांमध्ये जनजागृती करण्यात येये. ह्या वर्षीचे घोषवाक्य “चला हिवतापाला संपवू या:पुन्हा योगदान द्या,पुनर्विचार करा,पुन्हा सक्रिय व्हा…” असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन वानखेडे यांनी म्हटले आहे.
‘प्रोटोजुअन प्लाज्‍मोडियम’ नावाच्या कीटाणूच्या मादी एनोफिलीज डासापासून मलेरिया होतो. आजवर या आजाराने जगभरात अनेकांचे बळी घेतले आहेत. जागतिक आरोग्य संघटना (WHO) ने या विषाणूचे वर्णन साथीचा आजार असे केले आहे. जागतिक मलेरिया दिन हा मलेरिया प्रतिबंध, नियंत्रण आणि या आजाराचे निर्मूलन या गोष्टींबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी साजरा केला जात असल्याचे जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.विनोद चव्हाण यांनी म्हटले आहे.
मलेरिया हा सर्वात सामान्य परंतु गंभीर आजारांपैकी एक आहे. मलेरिया हा परजीवीमुळे  होणारा रोग आहे, जो मादी अ‍ॅनोफिलीज डासाच्या चावण्यामुळे होतो. मलेरिया हा डासांमुळे पसरणारा एक सामान्य आजार आहे. यावर वेळीच उपचार न झाल्यास रुग्णाला अनेक गंभीर समस्यांना सामोरे जावे लागू शकते, अगदी रुग्णाचा मृत्यूही होऊ शकतो असे तज्ज्ञांचे मत आहे. डास चावल्यानंतर हे परजीवी अगदी सामान्यपणे रक्तात जाऊ शकतात आणि तुम्हाला संक्रमित करू शकतात.हे परजीवी रक्तात गेल्यानंतर लाल रक्तपेशींमध्ये (RBC) पसरू शकतात आणि 48 ते 72 तासांच्या आत दुप्पट पटीने वाढू शकतात.वेळेत उपचार न केल्यास मलेरियाच्या इतर गंभीर परिणामांमध्ये किडनी निकामी होणे, लिव्हर निकामी होणे, एडिमा आणि मेंदूचा संसर्ग होऊन शेवटी मृत्यु ओढु शकतो.
जाणून घ्या कशामुळे होतो मलेरिया….
मलेरिया एक असा आजार आहे, जो संक्रमित डासांमध्ये असलेल्या परावलंबी विषाणूमुळे होतो. हे विषाणू एवढे छोटे असतात की, आपण याला पाहू शकत नाही. आपल्या गोंदिया जिल्ह्यात मलेरिया हा ताप प्रामुख्याने दोन प्रकारचे प्लॉस्मोडियम व्हायव्हॅक्स किंवा प्लॉस्मोडियम फेल्सीफॅरम नावाच्या व्हायरसमुळे होतो.ऍनाफिलीस नावाच्या संक्रमित मादी डासाच्या चावण्यामुळे मनुष्याच्या रक्त प्रवाह्यामध्ये हा व्हायरस जातो आणि केवळ तोच डास व्यक्तीला मलेरिया पीडित बनवू शकतो, ज्याने आधी एखाद्या मलेरिया संक्रमित व्यक्तीला चावले असेल. हा विषाणू लिव्हरपर्यंत जाऊन त्याच्या काम करण्याच्या क्षमतेला बिघडवतो.
डास चावल्यानंतर हे परजीवी अगदी सामान्यपणे रक्तात जाऊ शकतात आणि तुम्हाला संक्रमित करू शकतात.
डेंग्यू पसरवणाऱ्या एडीस इजिप्टाय या डासाची तसेच मलेरिया पसरवणाऱ्या अॅनॉफिलिस स्टीफेन्सी या डासाची उत्पत्ती स्वच्छ पाण्यात होते.आरोग्य विभागाच्या एका केलेल्या सर्वेक्षणादरम्यान घरात व घराशेजारील परिसरात साचलेल्या चमचाभर पाण्यातही डेंग्यू व मलेरियाचा प्रसार करणाऱ्या डासांची उत्पत्तीस्थाने आढळून येतात.हे लक्षात घेऊन आपल्या घराच्या व कार्यालयाच्या परिसराभोवती पाणी साचू शकेल, अशी ठिकाणे नष्ट करणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे.
टायर व्यतिरिक्त पावसाचे वा इतर पाणी साचू शकेल, अशा अनेक वस्तूही हटवण्यात आले पाहिजे . यामध्ये प्रामुख्याने चहाचे कप, कागदी पेले, थर्माकोल, नारळाच्या करवंट्या, फोडलेली शहाळी, पत्रे, पन्हाळे, घरावर टाकलेले प्लास्टिक यांसारख्या वस्तूंचा समावेश येतो.
मलेरिया आजाराची लक्षणं
डास चावल्यानंतर साधारणता आठ दिवसाने मलेरियाची लक्षणं सुरू होतात. यामध्ये ताप येणे, शरीर थरथरणे ,थकवा येणे, घाम येणे, स्नायू दुखणे, डोकेदुखी, अंगदुखी, मळमळ होणे, उलटी होणे आणि
चक्कर येणे ही मलेरियाची लक्षणं आहेत.  यामधील कोणतीही लक्षणं जर तुम्हाला जाणवली तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊन औषध घेऊ शकतात. कधी कधी ही लक्षणे प्रत्येक 48 ते 72 तासांमध्ये पुन्हा पुन्हा दिसतात.

अशा प्रकारे करावा या आजाराला प्रतिबंध…
– मच्छर-दाणी लावून झोपावे आणि आसपासची जागा स्वच्छ असणे गरजेचे आहे.
– साधारणतः मलेरियाचे डास संध्याकाळी चावतात.
– घरात डास मारण्याची औषधे आणि मच्छर रिपेलंटचा वापर करावा.
– घराच्या खिडक्या आणि दरवाज्यांना जाळी लावावी .
– असे कपडे घालावे, ज्याने तुमचे शरीर पूर्णपणे झाकले जाईल आणि त्याचा रंग फिका असावा.
– अशा जागी जाऊ नये, जेथे झाडे असतील, कारण तिथे डास असू शकतात.
– अशा ठिकाणी जाऊ नये, जिथे पाणी साचलेले असेल कारण तिथे हे डास असण्याची दाट
शक्यता असते.
मलेरियापासून बचाव करण्यासाठी

  • डासोत्पती स्थाने नष्ट करणे व कोरडा दिवस पाळणे
  • घराच्या व कार्यालयाच्या परिसराभोवती पाणी साचू शकेल, अशी ठिकाणे नष्ट करणे.
  • व्यतिरिक्त पावसाचे वा इतर पाणी साचू शकेल, अशा अनेक वस्तूही हटवण्यात आले पाहिजे. यामध्ये प्रामुख्याने चहाचे कप, कागदी पेले, थर्माकोल, नारळाच्या करवंट्या, फोडलेली शहाळी, पत्रे, पन्हाळे, घरावर टाकलेले प्लास्टिक यांसारख्या वस्तूंचा समावेश येतो.

कीटकजन्य आजार नियंत्रणा करिता मोहिम काळातच नाही तर नेहमीसाठी आपल्या सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवावा.घरातील पाणी साठ्यावर झाकण ठेवावे, आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा, मच्छरदाणीचा वापर करावा, खिडक्यांना जाळ्या बसवाव्यात, संडासच्या व्हेंट पाईपला जाळी बसवावी, भंगार सामान व निकामी टायर यांची विल्हेवाट लावावी,कुलर,फ्रिजच्या ड्रीपपॅन मधील पाणी नियमितपणे स्वच्छ करावे. पाण्याचा हौद,टाक्या,रांजण इत्यादी दर आठवड्याला स्वच्छ करावे. नाल्या, गटारे वाहती करणे,ताप आल्यास नजीकच्या आरोग्य संस्थेमधुन रक्त तपासून घेणे, कुलरच्या टाकीतील पाणी आठवड्यातून एकदा कोरडे करणे, साचलेल्या पाण्यात डबक्यात जळलेले ऑइल/ रॉकेल सोडणे, डासाला पळवुन लावणार्या साधनांचा वापर करणे, झोपताना मच्छरदाणीचा वापर करणे,फुलदाणी मधील पाणी बदलवित जाणे, घराच्या आजुबाजुला असलेले टायर्स, बाटल्या, बादल्या , करवंटे, या मधील पाणी फेकणे अशा विविध उपाययोजना

  • मच्छरदाण्या वापरणे

पाण्याचा किंवा कचऱ्याचा योग्य निचरा न झाल्यामुळे त्या ठिकाणी सांडपाणी साचून राहते. या सांडपाण्यामध्ये मलेरियाच्या डासांची उत्पत्ती होते. त्यामुळे अशावेळी आपल्या आणि मुलांच्या काळजीसाठी घरात मच्छरदाणी किंवा मच्छर पळवणा-या उद्बत्ती लावून झोपा.

  • डास नाशकाचा वापर

डासांचा नायनाट करण्यासाठी तुम्हाला फवारणी करणे शक्य नसेल तर डास नाशकाचा वापर करा. हल्ली डासांसाठी बरेच मलम मिळ्तात ते तुम्ही लावू शकता. त्यामुळे तुम्हाला डास चावणार नाही.

  • तापाची काळजी घेणे

मलेरियामुळे येणारा ताप हा खूपच त्रासदायक असतो. असा ताप तुमचे आरोग्य खालावू लागतो. तुम्हाला येणारा सततचा ताप घालवण्यासाठी तुम्ही थंड पाण्यात मिठाच्या पाण्याच्या घड्या ठेवू शकता. मीठाच्या पाण्याचा घड्या ठेवल्यामुळे ताप कमी होण्यास मदत मिळते.

  • पोषक आहार

मलेरिया झाल्यानंतर काहीही खाण्याची इच्छा होत नाही. पण आजारातून बाहेर पडण्यासाठी चांगला आहार गरजेचा असतो. तुमच्या आहारात फळ, भाज्या यांचा समावेश करायला हवा म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त उर्जा मिळायला मदत मिळेल.
डासांच्या आजारापासून असे राहा दूर 
* आठवड्यातून एक दिवस सर्वांनी कोरडा दिवस पाळावा.
* घरासमोर पाणी साचू देऊ नका, घर व परिसर स्वच्छ ठेवा.
* पाण्याचे टँक तथा बैरेल स्वच्छ ठेवा, टँक उघडे ठेवू नका.
* सायंकाळी दरवाजे, खिडक्या बंद करून ठेवाव्यात; खिडक्यांना जाळ्या बसवाव्यात.
* झाडांच्या कुंड्यांत पाणी साचू देऊ नका; त्या ठिकाणी स्वच्छता ठेवा.
* घरातील फ्रिज, कुलरमधील पाणी वारंवार बदलावे.
डासांची वाढ रोखणेसाठी खालील सोप्या उपाययोजना कराव्यात –
1) घरातील सर्व पाणी साठे झाकुन ठेवावेत.
2) साठवलेल्या पाण्याची भांडी कापडाने झाकून घ्यावीत.
3) जे सिमेंटचे कंटेनर रिकामे करता येत नाहीत अशामध्ये गप्पी मासे किंवा टेमिफोस या
अळीनाशकांचा वापर करावा.
4) गावांमध्ये आठवड्यातुन एक दिवस कोरडा दिवस पाळण्यात यावा.
5) वेंट पाइपला जाळ्या बसवावेत.
6) गावातील निरुपद्रवी निरुपयोगी असणाऱ्या टायरचे एकत्रित संकलन करून त्याचा
नायनाट  केल्यास 25 टक्के रुग्ण संख्येत घट होऊ शकते.
7) गटारी वाहती करावीत.
8) घराच्या दारे खिडक्यांना जाळ्या बसवाव्यात.
9) रात्री तसेच दुपारी झोपताना मच्छरदाणीचा वापर करावा .
10) दिवसा पूर्ण अंग झाकले जाईल असे कपड्यांमध्ये राहावे.
11) संध्याकाळी घरामध्ये धूर करावा.
जनतेसाठी आवाहन –

  • ताप आल्यास त्वरित सरकारी दवाखान्यांमध्ये दाखवावे.
  • कोणताही ताप अंगावर काढू नये.
  • या आजारासाठीचे सर्वोत्तम निदान व उपचार सरकारी दवाखान्यांमध्ये मोफत आहे तरी याचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा.
  • घराच्या आजू बाजूला पाणी साठून देऊ नका.
  • कोणत्याही परिस्थीतीत डासांसाठी पोषक वातावरण निर्माण करू नका.