*सोमाजी वंजारी यांच्या पुतळ्याचे अनावरण संपन्न
चित्रा कापसे
तिरोडा–समाजामध्ये काही लोक दानशूर व समाजसेवक असतात आपल्या स्वकर्तुत्वाने समाजाचे भले व्हावे यासाठी खूप प्रयत्न करतात आणि प्रसंगी स्वतःचे समाजाहितासाठी समर्पित करुन जनतेसाठी झटत असतात. अशा चांगल्या लोकांच्या चांगल्या कामांना प्रोत्साहन व प्रसिद्धी दिलीच पाहिजे. असे गांगला येथील ज्येष्ठ समाजसेवक व माजी सरपंच दानसूर नेतृत्व स्वर्गीय श्रीराम सोमाजी वंजारी यांच्या प्रतिमेचे लोकार्पण शिवालय परिसर गांगला येथे करण्यात आले .त्यावेळेस अध्यक्षीय भाषणातून प्राचार्य तथा पत्रकार डी आर गिरीपुंजे यांनी सांगितले.
यावेळी स्वर्गीय श्रीराम सोमाजी वंजारी यांच्या प्रतिमेचे लोकार्पण माजी आमदार दिलीप बन्सोड यांचे हस्ते, प्राचार्य, पत्रकार तथा महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज जिल्हा गोंदियाचे कार्याध्यक्ष डी. आर. गिरीपुंजे यांचे अध्यक्षतेखाली, सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक योगेश पारधी, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेश धुर्वे, ज्येष्ठ समाजसेवक दुलीचंद बुद्धे,युवराज कुंभलकर ,माजी सरपंच सोनाली बुद्दे ,बंडू हटवार, गोपाल वंजारी, जागृती लोहिया ,अशोक बोपचे, प्रमिला उके ,आशा सार्वे ,एडवोकेट लखनसिंह कटरे, माजी सभापती प्रेमलाल रहांगडाले, ज्येष्ठ समाजसेवक रामसागर धावडे, संजय किन्दरले माजी जि प सदस्या छायाताई कुंभलकर, सरपंच सुभाष वडीचार, उपसरपंच राजू नंदेश्वर, सदस्य देवेंद्र कुंभालकर, सदस्य पद्मा टेंभेकर, निशा ठवकर, बलराम साठवणे, सरपंच संजय बुद्धे, दानवीर नंदेश्वर, चंदन गोपाल वंजारी ,हितेश सुरेश वंजारी ,यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी माजी आमदार दिलीप बन्सोड यांनी श्रीराम वंजारी यांच्या बाबतचे आलेले अनुभव व प्रसंग सांगून जनतेला मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून दुलीचंद बुद्धे यांनी श्रीराम वंजारी यांच्या जीवनावर सविस्तर प्रकाश टाकून त्यांनी केलेल्या विविध कार्याची प्रशंशा याप्रसंगी केली .असे हे महान व्यक्तिमत्व व त्यांची आठवण राहावी म्हणून आपण वंजारी कुटुंबीयांच्या वतीने या प्रतिमेचे लोकार्पण करीत असल्याचे सांगितले .
कार्यक्रमाचे संचालन व प्रास्ताविक दुलीचंद बुद्धे यांनी तर आभार प्रदर्शन चंदन गोपाल वंजारी यांनी केले . यशस्वीतेसाठी गांगला परिसरातील नागरिक व वंजारी कुटुंबातील पुरुष तथा महिलांनी फारच मोलाचे कार्य केले.