चित्रा कापसे
तिरोडा-सिंचन प्रकल्प मंजूर करण्यात तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले हे नेहमी अग्रेसर असून धापेवाडा उपसा सिंचन योजना यांच्याच कारकिर्दीत कार्यान्वित झालेली आहे. धापेवाडा उपसा सिंचन योजनेअंतर्गत बोदलकसा डाव्या कालव्यावरून आलेझरी लघु कालवा तसेच भदभदया गुरुत्वाकर्षण फिडर कालव्याचा उगम स्थानाची प्रत्यक्ष जाऊन पाहणी करून कालवा सरेखन आखणी केली जेणेकरून जास्तीत जास्त क्षेत्रास सिंचनाचा लाभ मिळेल, यासोबतच कोवेसर तलावाची पाहणी करून गावक-यांच्या मागणीनुसार या तलावात बोदलकसा गुरुत्वाकर्षण फिडरद्वारे पाणी सोडण्याचे नियोजन करण्याबाबत निर्देश दिले. यामुळे बेरडीपार येथील शेतक-यांची सिंचनाच्या पाण्याची समस्या दूर होई.ल याकरिता तातडीने सर्वेक्षण करून तलावाचा कालव्याचे नूतनीकरण करण्याचे निर्देश दिले. या भेटीदरम्यान कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती जितेंद्र रहांगडाले, उपसा सिंचन कार्यकारी अभियंता अंकूर कापसे, सहायक अभियंता पंकज गेडाम, भोसले, सरपंच मिलिंद कुंभरे व गावकरी उपस्थित होते.