अज्ञात वाहनांच्या धडकेत काळवीट ठार

0
28

तुमसर :- गोंदिया राष्ट्रीय महामार्गावरील तुमसर वनपरीक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या माडगी शिवारात २४ एप्रिल रोजी सकाळ दरम्यान अज्ञात वाहनाने काळवीटाला धडक दिल्याने जागिच ठार झाल्याची घटना समोर आली आहे. तालुक्यातील तुमसर -गोंदिया राष्ट्रीय मार्गावर माडगी शिवारात अन्नपाण्याच्या शोधात हरीण आणि काळवीट यांच्यासह अन्य वन्यप्राणी नागरी वस्तीकडे धाव घेत आहेत. या राष्ट्रीय महामार्गावरुन भरधाव वेगाने जाणारी वाहने अनेकदा प्राण्यांचा जीव घेतल्याची उदाहरणे आहेत.

त्यात काही दिवसापूर्वी हरीण ठार झाल्याची घटना घडली होती. परंतु वनविभागाच्या कडक कायद्याच्या धाकात सुध्दा वाहनचालक मुक्या प्राण्यांचा जीव वाचविण्याचे प्रयत्न अजिबात करीत नसल्याचे उदाहरण समोर येत आहेत. त्यात उपचाराअभावी अनेक .वन्यप्राण्यांच्या जीव गेल्याची अनेक उदाहरणे ऐकण्यास मिळाली आहे . दरम्यान २४ एप्रिल रोजी सकाळच्या दरम्यान चारा पाण्याच्या शोधात जंगलातून बाहेर पडत गावाकडे मार्ग क्रमण करणाऱ्या एका काळवीट ला अज्ञात वाहनाने रस्ता ओलांडताना जबर धडक दिली. त्यात काळवीट जागिच ठार झाला.सदर घटनेची माहिती तुमसर व वनपरिक्षेत्र (Forest area) क्षेत्र कार्यालयाला देण्यात आली.

दरम्यान वन विभागाची चमू घटनास्थळी पोहचली भटक्या,व हिंस्र, श्वानापासुन,अथवा वाहनापासुन मृत काळवीटाला धोका पुन्हा पोहचु नये म्हणून येणाऱ्या- जाणाऱ्या वन्यप्रेमींनी काळविटाला (antelope) राष्ट्रीय महामार्गावरुन बाजूला करुन घटनास्थळी वन्यप्रेमी तळ ठोकुन होते अशी माहिती आहे.मृत काळविटावर वन अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जंगलात अंत्यसंस्कार करण्यात आले.