गोंदिया : सीपीआर हा शब्द आपल्यापैकी अनेकांनी ऐकला आहे. मात्र, आपल्यातील अनेकांना सीपीआर म्हणजे काय हे माहीत नाही. सीपीआर म्हणजे कार्डिओपल्मोनरी रिसुसिटेशन. एखाद्याला हृदयविकाराचा झटका आल्यास एखाद्याचा जीव वाचवताना या तंत्राचा उपयोग केला जातो.आता, हे तंत्र प्रत्येक नागरिकांनी शिकणे गरजेचे बनले असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन वानखेडे यांनी सांगितले.
तरुणांसह सर्व वयोगटातील लोकांमध्ये अचानक हृदयविकाराचा झटका किंवा अचानक मृत्यूची वाढती प्रकरणे ही एक मोठी चिंतेची बाब बनली आहे. एखादी व्यक्ती जी हसत होती, गात होती, खेळत होती आणि सामान्य दिसत होती, ती अचानक कोसळते आणि मृत्युमुखी पडते. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने अलीकडेच सीपीआर अर्थात कार्डिओपल्मोनरी रिसुसिटेशन सीपीआर) मध्ये प्रशिक्षण देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मोहीम सुरू केली आहे. ज्यामुळे हृदयविकाराच्या स्थितीत रुग्णाचा जीव वाचविणे शक्य होते. वैद्यकीय, शिक्षणासह सर्व संस्थांमध्ये ही मोहीम राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्था जिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्र येथील वैद्यकीय अधिकारी यांचे मूलभूत प्रशिक्षण जिल्हास्तरावरून देण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अमरिश मोहबे यांनी दिली.
सीपीआर म्हणजे काय
आजारी व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये नेण्याआधी जिवंत ठेवण्यासाठी हृदयाच्या स्नायूवर दबाव आणण्यासाठी सीपीआर एक विशेष तंत्र वापरते. जेव्हा हृदयविकाराचा झटका येतो, तेव्हा हृदय, मेंदू आणि फुफ्फुसांसह उर्वरित शरीरात रक्त पंप करू शकत नाही.
अशा परिस्थितीत या तंत्राने रुग्णाचा जीव वाचू शकतो. सीपीआर म्हणजे कार्डिओपल्मोनरी रिसुसिटेशन जेव्हा हृदयातील हृदय धडधडणे घडते किंवा इतर हृदयाच्या चरणांच्या अवयवांमध्ये रक्त परिच्छेद करण्यासाठी खूप कार्यक्षम असते, तेव्हा ते जीव वाचवण्यास मदत करू शकते.
अनेक रुग्णांचा जीव वाचविण्यास मदत
कार्डियाक अरेस्टच्या बाबतीत ३ ते १० मिनिटांचा वेळ खूप महत्त्वाचा असतो. एका अभ्यासातून असे समोर आले आहे.
देशात दरवर्षी सुमारे दहा लाख लोकांचा मृत्यू फक्त हृदयविकाराच्या झटक्याने होतो. एखाद्या प्रशिक्षित व्यक्तीने पीडितेचा जीव वाचविण्याचा प्रयत्न केल्यास सुमारे साडेतीन लाख लोकांचे प्राण वाचू शकत असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन वानखेडे यांनी दिली.हृदयविकाराचा झटका किंवा श्वासघात, सीपीआर लागू केल्याने व्यक्तीचे जीवन वाचू शकत असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. तृप्ती कटरे यांनी सांगितले.
आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण
प्राथमिक आरोग्य केंद्र शेंडा येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. जगन्नाथ चाटे व डॉ. अमिता नरडेले यांनी कार्यक्षेत्रातील आरोग्य कर्मचारी यांचे सीपीआरबाबत प्रशिक्षण, तर प्रात्यक्षिक समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक उजवणे यांनी घेतले. प्राथमिक आरोग्य केंद्र चिखली येथे वैद्यकीय अधिकारी डॉ. वंदना घरोटे यांनी प्रशिक्षण दिले.