गोंदिया : जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा गुरुवारी (दि.२४) शहरातील जयस्तंभ चौकात निषेध नोंदविला. तसेच दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहिली. यानंतर यासंबंधीचे निवेदन महामहीम राष्ट्रपतींच्या नावे उपविभागीय अधिकाऱ्यांना जिल्हाध्यक्ष दिलीप बन्सोड यांच्या नेतृत्वात देण्यात आले. जम्मू काश्मीर येथे विविध भागांतील पर्यटक मोठ्या प्रमाणात पर्यटनासाठी जातात. मात्र पहलगाम येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या हल्ल्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. ही घटना घडली तेव्हा केंद्र सरकारची गुप्तचर यंत्रणा काय करीत होती असा सवालदेखील काँग्रसने उपस्थित केला. केंद्र सरकार देशवासीयांची सुरक्षा करण्यात अपयशी ठरली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी. याप्रकरणी दोषींवर कारवाई करण्यात यावी, गुप्तचर विभागाच्या प्रमुखांवर कारवाई करण्यात यावी, दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या मृतकांच्या कुटुंबीयांना ३० लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात यावी, काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांना सरकारने त्यांच्या स्वगृही पोहोचवावे आदी मागण्यांचा समावेश होता.
शिष्टमंडळात यांचा समावेश जिल्हाध्यक्ष दिलीप बन्सोड, अमर वऱ्हाडे, अशोक चौधरी, योगेश अग्रवाल, राजकुमार पटले, वंदना काळे, गौरव बिसेन, चित्रा लोखंडे, किशोर भोयर, नागरत्न बन्सोड, दिनेश गेडाम, कृष्णकुमार कठाणे, शैलेश जयस्वाल, राहुल बावनथडे, मनीष चव्हाण, अमित बघेले, नीलेश लांजेवार, रामभाऊ शेंडे आदींचा समावेश होता.