जिल्हास्तरीय गुणवंत विद्यार्थी व कर्तव्यदक्ष अधिकारी, कर्मचारी सन्मान सोहळा ‘ध्येयतरंग’ 26 एप्रिल रोजी

0
12

गुणवंत 221 विद्यार्थ्यांचा होणार गौरव…

ध्येय एज्युकेशन फाऊंडेशन व ध्येय प्रकाशन अकॅडमी महाराष्ट्र, जिल्हा गोंदियाचे आयोजन

गोंदिया,दि.25: दिनांक 5 जानेवारी 2025 ला घेण्यात आलेल्या आय एम विनर व 2 मार्च ला झालेल्या विनर ऑफ द इयर या राज्यस्तरीय प्रज्ञाशोध स्पर्धा परीक्षेचा जिल्हास्तरीय गुणवंत विद्यार्थी पुरस्कार व कर्तव्यदक्ष अधिकारी कर्मचारी यांचा सन्मान सोहळा दिनांक 26 एप्रिल 2025 रोजी पंचायत समिती गोंदियाच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या आहे. अशी माहिती ध्येय प्रकाशन अकॅडमी चे गोंदिया जिल्हा प्रमुख वशिष्ठ खोब्रागडे यांनी दिली आहे. सदर कार्यक्रमाचे आयोजन ध्येय एज्युकेशन फाऊंडेशनचे अध्यक्ष सुदाम शेंडगे व ध्येय प्रकाशन अकॅडमीच्या संस्थापिका सौ. अर्चना शेंडगे यांच्या मार्गदर्शनात होत आहे.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून गोंदिया विधानसभा क्षेत्राचे लाडके जनता के आमदार विनोद अग्रवाल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगानंथम (भाप्रसे), गोंदिया जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा शिक्षण सभापती सुरेश हर्षे, गोंदिया पंचायत समिती सभापती मुनेश रहांगडाले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी फरेंद्र कुतीरकर, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गोंदियाचे प्राचार्य डॉ. नरेश वैद्य, चंद्रपूरचे प्राचार्य राजकुमार हिवारे, जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी सुधीर महामुनी, माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. महेंद्र गजभिये, ज्येष्ठ अधिव्याख्याता श्रीमती सरस्वती सूर्यवंशी, पंचायत समिती गोंदियाचे गट विकास अधिकारी आनंदराव पिंगळे, अधिव्याख्याता पुनम घुले, डॉ. भाऊराव राठोड व सर्व गटशिक्षणाधिकारी राहणार असून यांचे शुभहस्ते विद्यार्थी व कर्तव्यदक्ष अधिकारी, कर्मचारी यांना सन्मानित करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमात आय एम विनर राज्यस्तरीय प्रज्ञाशोध स्पर्धा परीक्षेमध्ये नागपूर विभागात गुणवत्ता यादीत आलेले 14 विद्यार्थी, जिल्हा गुणवत्ता यादीत आलेले 48, तालुका गुणवत्ता यादीत आलेले 36, केंद्र यादीत आलेले 50 विद्यार्थी, विनर ऑफ द इयर परीक्षेत राज्यस्तरीय गुणवत्ता प्राप्त केंद्रनिहाय टॉपर 47 विद्यार्थी, जिल्हास्तरीय 36 विद्यार्थी एकूण 221 विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.

कर्तव्यदक्ष अधिकारी/ कर्मचारी म्हणून यांचा होणार सन्मान –
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी – एम. मुरुगानंथम, प्राचार्य डाएट डॉ. नरेश वैद्य, शिक्षणाधिकारी सुधीर महामुनी, डॉ. महेंद्र गजभिये, गट शिक्षणाधिकारी विशाल डोंगरे, शिक्षण विस्तार अधिकारी/गशिअ महेंद्र मोटघरे, केंद्रप्रमुख निशा बोदेले, समग्र शिक्षा बालरक्षक जिल्हा समन्वयक कुलदीपिका बोरकर, समग्र शिक्षा गटसमन्वयक सुनील बोपचे, विषय साधनव्यक्ती सुनील ठाकूर, समावेशित विशेष तद्न्य जगदीश राणे, विशेष शिक्षक विनोद फुंडे, सिंगापूर वारी करून आलेले उपक्रमशील शिक्षक नरेंद्र अमृतकर देवरी, नरेंद्र गौतम गोंदिया, बंद पडलेल्या जिल्हा परिषद हायस्कूल देवरीला पुनरुज्जीवन देणारे मंगलमूर्ती संयाम, विद्यार्थी गुणवत्तेसाठी झटणारे शिक्षक संजय वैद्य गोरेगाव, धनंजय रामटेके आमगाव, सुरेंद्र भैसारे अर्जुनी मोर, कु. शुभांगी चौधरी तिरोडा, योगधन मांढरे सडक अर्जुनी, योगराज राऊत सालेकसा या शिक्षकांचा तसेच लोकशाहीचा 4 था स्तंभ असणारे नरेश रहिले, तालुका प्रतिनिधी धनराज भगत,सौ.कविता लिचडे व अनाथांची माय म्हणून ओळखले जाणाऱ्या समाजसेविका प्रा. डॉ. सविता बेदरकर यांचा ध्येय एज्युकेशन फाऊंडेशन तर्फे सन्मान होणार आहे.