मातोश्री पांदन रस्त्याच्या कामांचे नियोजन करा-आ. विजय रहांगडाले

0
28

तिरोडा-तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले यांनी तिरोडा तालुक्यातील महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमीचा आढावा घेतला असून यामध्ये शेतक-यांना शेतामध्ये जाण्याकरिता पांदन रस्ता बांधकाम करण्याकरिता विशेष लक्ष देण्याबाबत आदेश दिले ज्यामुळे शेकत-यांची समस्या कायमस्वरुपी दूर होण्यास मदत होईल तसेच नाला सरळीकरन तलावाची कामेसुद्धा नियोजनात समाविष्ट करण्याबाबतचे निर्देश दिले यामध्ये प्रामुक्याने तिरोडा तालुक्यात सन २०२४-२५ मध्ये एकूण ३४८१ कामांना प्रशासकिय मंजुरी देण्यात आलेली असून त्यापैकी १४५५ कामे सुरु असून १०७३ कामे पूर्ण झालेली आहेत उर्वरीत कामे अपूर्ण असून प्रगतीपथावर असल्याची माहिती संबधीत विभागांनी दिली या बैठकीमध्ये प्रामुख्याने जी.प.सदस्या तुमेश्वरी बघेले, माधुरी रहांगडाले, प.स.सभापती तेजराम चव्हाण उपसभापती सुनंदा पटले, प.स.सदस्य ज्योती शरणागत, प्रमिला भलाई, हुपराज जमाईवार, चेतलाल भगत, गटविकास अधिकारी सतीश लिल्हारे व तालुक्यातील रोजगार सेवक तसेच यंत्रनेचे सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.