मका उत्पादक शेतक-यांची व्यापाऱ्यांकडून लुट

0
110

= शेतकरी एकवटले,अधिकारी व पदाधिका-यांना निवेदन सादर
अर्जुनी-मोर. ( सुरेंद्रकुमार ठवरे ) -शेतक-यांनी कोणतेही पिकांचे उत्पादन घेतले तरी शासन,प्रशासन व व्यापारी यांचेकडुन नेहमीच भरडला जातो.नव्हे सर्वत्र शेतक-यांची लुट केली जाते.सध्या मका हंगाम जोरात सुरु आहे.अशामधे मका खरेदी करणा-या व्यापा-यांनी शेतक-यांनी लुबाडण्याचे धोरण अवलंबविल्याने हताश झालेले बोंडगावदेवी परिसरातील शेतकरी रत्नाकर बोरकर,राधेश्याम झोळे,कृष्णा झोळे,महादेव कापगते,शालीक बोरकर,यादोराव बोरकर,यांचे नेतृत्वात एकवटले असुन लुटमार करणा-या व्यापा-यांना मकाच विकणार नाही.व लुटमार करणा-या व्यापा-यांवर कडक निर्बंध लावुन कार्यवाही करण्यात यावी यासाठी बोंडगावदेवी परिसरातील शेतक-यांनी 24 एफ्रील रोजी रात्रौ रमाई चौकात सभा घेवुन 25 एप्रिल ला बाजार समितीचे सभापती,उपविभागीय अधिकारी तथा तहशिलदार यांना निवेदन दिले.
याबाबत प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनानुसार अर्जुनी-मोर. तालुक्यासह बोंडगांवदेवी परिसरात कमी पाण्याचे पिक म्हणुन हजारो हेक्टर मधे मका पिकाची लागवड करण्यात आली.सध्या मकापिकाची खरेदी खाजगी व्यापाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात सुरु आहे.मका खरेदी करताना व्यापारी क्किंटल मागे चारशे रुपयाची लूट करीत आहेत असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. संबंधित अधिकारी व बाजार समितीने शेतकऱ्याची लूट थांबवावी यासाठी निवेदन दिले आहे. यामध्ये शेतकऱ्यांकडून भराई व काटा कराई या दोनच हमालीची मजुरी शेतकऱ्याकडून घेणे आवश्यक आहे. परंतु स्वतःच्या ट्रकमध्ये भरण्याची हमाली सुद्धा हे व्यापारी शेतकऱ्यांकडून घेत आहेत. वास्तविक वजन झाल्यानंतर तो माल व्यापाऱ्यांच्या मालकीचा असतो त्यामुळे तिसरी हमालीची मजुरी शेतकऱ्याकडून घेण्यात येऊ नये, शासनाच्या हमीभावापेक्षा कमी भावाने घेऊ नये, असे व्यापाऱ्यांना बंधन आहे. परंतु व्यापारी तीनशे रुपये कमी भावाने मका खरेदी करून शेतकऱ्यांची लूट करीत आहेत. शेतकऱ्याला मका विक्रीची वजन पावती छापील लायसन्स नंबर सह देणे बंधनकारक आहे. परंतु व्यापारी पावती देत नाहीत. शेतकऱ्यांनी पावती मागितल्यास आपला माल घेऊन जा असे उलट उत्तर दिले जाते, माल मोजून झाल्यावर व गोडाऊनमध्ये नेल्यानंतर शेतकऱ्यांचा नाईलाज असतो त्यामुळे तो परत नेत नाही. बाहेरगाहून येणाऱ्या व्यापारांची तक्रार केली जाते. व त्याला वापस जाण्यास भाग पाडले जाते. बोंडगाव देवी परिसरातील धरम काटे व इलेक्ट्रिक वजन काट्यात फरक ठेवले जाते. अशी शेतकऱ्यांची माहिती असून त्यांची चौकशी करून वजन काटे दोष रहित करावे, काही व्यापारी शेतकऱ्यांना अक्कल नसते अशी अरेरावीची भाषा वापरली जात आहे ,परिणामी सर्व मुद्दे लक्षात घेता क्विंटल मागे चारशे रुपयांनी शेतकऱ्याची लूट सुरू आहे ती लूट थांबावी यासाठी शेतकरी एकवटले असून लुटमार करणाऱ्या व्यापाऱ्यांना आम्ही मकाच विकणार नाही अशी भूमिका घेऊन अरेरावी करणाऱ्या वापरावर लगाम लावण्यात यावा यासाठी त्यांनी संबंधित अधिकारी व बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर केले आहे.
चौकट
शेतकऱ्यांची जो कोणी व्यापारी लूटमार करीत असेल त्याची गय केली जाणार नाही तसेच माल विक्रीची वजन पावती छापील लायसन्स नंबर सह देण्यात यावी जर पावती नंबर सह देत नसतील अशा व्यापाऱ्यांचे आम्ही लायसन्स रद्द करू व आपण नेहमी शेतकऱ्या सोबत राहू अशी भूमिका बाजार समितीचे सभापती यशवंत परशुरामकर यांनी घेतली आहे.