हिवताप नियत्रंणासाठी गुणवत्तापुर्वक 3“टी” टेस्टींग,ट्रिटमेंट व ट्रेसिंग कॉन्टॅक्टचा मंत्र उपयुक्त
-डॉ.नितीन वानखेडे
गोंदिया,दि.२६ः- जागतिक हिवताप दिनाच्या अनुशंगाने दि.25 रोजी आरोग्य विभागाच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, समाज कल्याण कार्यालय येथे आरोग्य कर्मचारी कार्यशाळा व 17 आरोग्य कर्मचाऱ्यांना हिवताप नियंत्रित करण्यासाठी आणि प्रतिबंधित करण्यासाठी समर्पित प्रयत्नांसाठी त्यानी केलेल्या कार्यासाठी सन्मानित केले असल्याची माहीती जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.विनोद चव्हाण यांनी दिली आहे.
जागतिक हिवताप दिनाच्या अनुशंगाने दि.25 रोजी जिल्हास्तरीय विविध जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात प्रामुख्याने शासकीय नर्सिंग महाविद्यालय मार्फत हिवताप प्रतिबंधात्मक जनजागृती प्रभातफेरी,दुसर्या कार्यक्रमात जिल्हा परिषद सभागृहात संपन्न झालेल्या कार्यक्रमात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम.मुरुगानंथन यांचे सह जिल्हास्तरीय अधिकारी यांने केलेले विविध पोष्टरच्या माध्यमातून जनजागृती व तिसर्या कार्यक्रमात आरोग्य कर्मचारी यांची कार्यशाळा व आरोग्य कर्मचार्यांचा सत्कार यांचा समावेश बाबतची माहीती जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.विनोद चव्हाण यांनी याप्रसंगी दिली आहे.
दि. २५ एप्रिल जागतिक हिवताप दिन अनुशंगाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, समाज कल्याण कार्यालय जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन वानखेडे तसेच अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.तृप्ती कटरे,जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.अभिजित गोल्हार,सहाय्यक संचालक कुष्ठरोग डॉ.महेंद्र धनविजय,जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.विनोद चव्हाण,जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ.रोशन राऊत,जिल्हा प्रशिक्षण केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.नितीन कापसे,जिल्हा साथरोग अधिकारी डॉ.निरंजन अग्रवाल,जिल्हा मौखिक तज्ञ डॉ.अनिल आटे,जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी विजय आखाडे,जिल्हा आयईसी अधिकारी प्रशांत खरात यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.यावेळी मान्यवरांच्या हस्ते हिवताप आजाराबाबत विविध पोष्टरच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली.
कार्यक्रम प्रसंगी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन वानखेडे यांनी गोंदिया जिल्हा हिवतापाबाबत संवेदनशील जिल्हा म्हणुन घोषित असुन जिल्हा हा भात शेतीसाठी प्रसिद्ध आहे.भात शेतीसाठी पाणीयुक्त चिखलची गरज भासते तसेच तलावांचा जिल्हा म्हणून वेगळी ओळख आहे.तसेच जंगलव्याप्त भाग,घनदाट झाडी व झुडपे यामुळे डास व डास अळीसाठी पोषक वातावरण असते.जिल्ह्यात बाराही महिने हिवताप आजाराचे रुग्ण निघत असल्यामुळे हिवतापाचा जर प्रसार रोखायचा असेल तर मच्छरांसोबत डास अळी सुद्धा नष्ट करणे गरजेचे बनलेले आहे.लोकसहभाग व ईतर विभाग,एनजीओ यांचा सहभाग घेणे गरजेचे असल्याचे सांगितले. आरोग्य कर्मचारी व आशा सेविका यांनी गावपातळीवर लोकांना आरोग्य शिक्षण देवुन त्यांच्या सवयी बदलण्याबाबत सामाजिक वर्तणुक बदलण्यावर विशेष लक्ष केंदीत करण्याच्या सुचना केल्यात.कीटकजन्य आजार नियंत्रणा करिता मोहिम काळातच नाही तर नेहमीसाठी आपल्या सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवावा. घरातील पाणी साठ्यावर झाकण ठेवावे,आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा,मच्छरदाणीचा वापर करावा,खिडक्यांना जाळ्या बसवाव्यात, संडासच्या व्हेंट पाईपला जाळी बसवावी,भंगार सामान व निकामी टायर यांची विल्हेवाट लावावी,कुलर,फ्रिजच्या ड्रीपपॅन मधील पाणी नियमितपणे स्वच्छ करावे.पाण्याचा हौद,टाक्या,रांजण इत्यादी दर आठवड्याला स्वच्छ करावे.नाल्या,गटारे वाहती करणे,साचलेल्या पाण्यात डबक्यात जळलेले ऑइल/ रॉकेल सोडणे, कुंडी व फुलदाणी मधील पाणी बदलवित जाणे, घराच्या आजुबाजुला असलेले टायर्स, बाटल्या, बादल्या,करवंटे,या मधील पाणी फेकणे,डासाला पळवुन लावणार्या साधनांचा वापर करणे, झोपताना पुर्ण अंग झाकले जाईल असे कपडे वापरावे, झोपताना मच्छरदाणीचा वापर करणे अशा विविध उपाययोजना अंमलात आणुन किटकजन्य आजार लोकसहभागातुन कमी करण्याचे आवाहन या दिवसाबाबत केलेले आहे.
आरोग्य कर्मचारी यांनी हिवताप नियत्रंणसाठी गुणवत्तापुर्वक 3“टी” टेस्टींग,ट्रिटमेंट व कॉन्टॅक्ट ट्रेसिंग म्हणजेच गृहभेटी तुन ताप सदृष रुग्णाची तपासणी,प्रकारानुसार तत्पर उपचार व सभोवतालचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग व नियमित फॉलोअप करण्याचा फार्मुला अवलबंविण्याचा दिला मंत्र.लोकसहभागातुन हिवताप प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याचे सुचना डॉ.वानखेडे यांनी आरोग्य कर्मचारी कार्यशाळेत दिल्या.
जिल्ह्यातील आरोग्य संस्थेत गावपातळीवर हिवतापाचे रुग्ण संख्या कमी करण्यास वैद्यकीय अधिकारी,समुदाय आरोग्य अधिकारी,आरोग्य सेवक,आरोग्य सेविका,प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी,औषध निर्माण अधिकारी,आरोग्य सहाय्यक,आशा सेविका, आरोग्य पर्यवेक्षक यांचे भरीव योगदान राहीले आहे. त्यांनी जबाबदारीने आपल्या कामाबाबत सातत्य टिकवुन ठेवले आहे म्हणुन त्यांचा कार्याचा गौरव करण्यात येत आहे.वास्तविक सर्व आरोग्य कर्मचारी यांचे योगदान चांगले आहे तरी त्यांचे प्रतिनिधि म्हणुन 17 आरोग्य कर्मचार्यांना सन्मान चिन्ह व प्रमाण पत्र देऊन सन्मानींत करण्यात आले.यावेळी 4 प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी,1 औषध निर्माण अधिकारी 4 आरोग्य निरिक्षक व 8 आरोग्य सेवक या विविध संवर्ग कर्मचारी यांचा समावेश होता. गौरविण्यात आलेल्या कर्मचार्यांमध्ये प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी डी.आर.सिंधीमेश्राम, पी.सी.गिल्ले, विजय बिसेन,एस.आर.शेख,औषध निर्माण अधिकारी जी.एस. दलाल तर आरोग्य निरीक्षक एम.एम.कामठे,एम.एम.इस्टाम,एस.
यावेळी कार्यक्रमाला गोंदिया तालुका आरोग्य अधिकारी डॉ.निलेश जाधव,सडक अर्जुनी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रणित पाटील,अर्जुनी मोरगाव तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सुकन्या कांबळे,तिरोडा तालुका आरोग्य अधिकारी डॉ.दर्शना नंदागवळी, देवरी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.ललित कुकडे,सालेकसा तालुका आरोग्य अधिकारी डॉ.स्वप्निल आत्राम,एनजीओ जिल्हा समन्वयक कांचन बिसेन यांचे सह हिवताप विभाग व आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
कार्यशाळे दरम्यान किशोर भालेराव,अनिल चोरवाडे,वर्षा भावे वआशिश बले यांनी हिवताप व किटकजन्य आजाराबाबतचे विविध विषयावर मार्गदर्शन केले. सत्कार कार्यक्रमाचे सुत्रसंचालन किशोर भालेराव तर आभार प्रदर्शन आशिश बले यांनी केले. सदर हिवताप दिवस साजरा करण्यासाठी आरोग्य पर्यवेक्षक ठाकरे,डोंगरे,आशिश बले,पंकज गजभिये व किशोर भालेराव यांनी विशेष सहकार्य केले.