गोंदिया,दि.२६ः-जागतिक हिवताप दिन अनुशंगाने जिल्हा परिषदेतील स्व. वंसतराव नाईक सभागृहात जिल्हास्तरीय कार्यक्रम जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगानंथम यांच्या अध्यक्षतेत संपन्न झाला.यावेळी कार्यक्रम प्रसंगी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन वानखेडे,अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.तृप्ती कटरे,जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.अभिजित गोल्हार,सहाय्यक संचालक कुष्ठरोग डॉ.महेंद्र धनविजय,जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.विनोद चव्हाण,जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ.रोशन राऊत, जिल्हा प्रशिक्षण केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.नितीन कापसे,जिल्हा साथरोग अधिकारी डॉ.निरंजन अग्रवाल,निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. भारती जयस्वाल,जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी विजय आखाडे प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी मुकाअ एम. मुरुगानंथम व जिल्हा स्तरीय अधिकारी यांचे हस्ते हिवताप आजाराबाबत विविध पोष्टरच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली.
कार्यक्रम प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगानंथम यांनी गोंदिया जिल्हा हिवतापाबाबत संवेदनशील जिल्हा म्हणुन घोषित असुन जिल्हा हा भात शेतीसाठी प्रसिद्ध आहे. भात शेतीसाठी पाणीयुक्त चिखलची गरज भासते तसेच तलावांचा जिल्हा म्हणून वेगळी ओळख आहे.तसेच जंगलव्याप्त भाग, घनदाट झाडी व झुडपे यामुळे डास व डास अळीसाठी पोषक वातावरण असते.जिल्ह्यात बाराही महिने हिवताप आजाराचे रुग्ण निघत असल्यामुळे हिवतापाचा जर प्रसार रोखायचा असेल तर मच्छरांसोबत डास अळी सुद्धा नष्ट करणे गरजेचे बनलेले आहे.लोकसहभाग व ईतर विभाग, एनजीओ यांचा सहभाग घेणे गरजेचे असल्याचे सांगितले. आरोग्य कर्मचारी व आशा सेविका यांनी गावपातळीवर लोकांना आरोग्य शिक्षण देवुन त्यांच्या सवयी बदलण्याबाबत सामाजिक वर्तणुक बदलण्यावर विशेष लक्ष केंदीत करण्याच्या सुचना केल्यात. कीटकजन्य आजार नियंत्रणा करिता मोहिम काळातच नाही तर नेहमीसाठी आपल्या सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवावा. घरातील पाणी साठ्यावर झाकण ठेवावे,आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा,मच्छरदाणीचा वापर करावा,खिडक्यांना जाळ्या बसवाव्यात, संडासच्या व्हेंट पाईपला जाळी बसवावी,भंगार सामान व निकामी टायर यांची विल्हेवाट लावावी,कुलर,फ्रिजच्या ड्रीपपॅन मधील पाणी नियमितपणे स्वच्छ करावे.पाण्याचा हौद,टाक्या,रांजण इत्यादी दर आठवड्याला स्वच्छ करावे.नाल्या,गटारे वाहती करणे,साचलेल्या पाण्यात डबक्यात जळलेले ऑइल/ रॉकेल सोडणे, कुंडी व फुलदाणी मधील पाणी बदलवित जाणे, घराच्या आजुबाजुला असलेले टायर्स, बाटल्या, बादल्या,करवंटे,या मधील पाणी फेकणे,डासाला पळवुन लावणार्या साधनांचा वापर करणे, झोपताना पुर्ण अंग झाकले जाईल असे कपडे वापरावे, झोपताना मच्छरदाणीचा वापर करणे अशा विविध उपाययोजना अंमलात आणुन किटकजन्य आजार लोकसहभागातुन कमी करण्याचे आवाहन एम.मुरुगानथंम यांनी या दिवसाबाबत केलेले आहे.
यावेळी कार्यक्रमाला जिल्हा आयईसी अधिकारी प्रशांत खरात,गोंदिया तालुका आरोग्य अधिकारी डॉ.निलेश जाधव,सडक अर्जुनी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रणित पाटील, अर्जुनी मोरगाव तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सुकन्या कांबळे,तिरोडा तालुका आरोग्य अधिकारी डॉ.दर्शना नंदागवळी, देवरी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.ललित कुकडे, सालेकसा तालुका आरोग्य अधिकारी डॉ.स्वप्निल आत्राम,तिरोडा उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.विजय शेंडे,जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक अर्चना वानखेडे, जिल्हा आयुष अधिकारी डॉ.मिना वट्टी,जिल्हा लेखा व्यवस्थापक संकेत मोरघरे यांचेसह जिल्ह्यातील सर्व ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक, आरोग्य विभाग व राष्ट्रिय आरोग्य अभियान कार्यक्रमाचे अधिकारी,जिल्हा समन्वयक व कर्मचारी वर्ग उपस्थित होते. जिल्हा कार्यक्रव जिल्ह्यातील सर्व तालुका आरोग्य अधिकारी, वैधकीय अधीक्षक उपस्थित होते.