Ø पंधरवाड्यादरम्यान प्रलंबित प्रकरणे निकाली काढणार
गोंदिया दि.27: महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाच्या दशकपुर्ती निमित्त दि. 28 एप्रिल ते दि.12 मे या कालावधीत लोकसेवा हक्क पंधरवाड्याचे आयोजन करण्यात आले आहे. या या कार्यक्रमास मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभागी व्हावे आवाहन जिल्हाधिकारी प्रजीत नायर यांनी केले आहे.
पंधरवाडा मोहिमेदरम्यान विशेष सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी विविध सेवा नमुद करण्यात आल्या आहे.त्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नवीन शासन निर्णयानुसार मदत निधीचे वितरण, प्रलंबित फेरफार नोंदीचा निपटारा करणे. पात्र लाभार्थ्यांना शिधापत्रिकांचे वितरण. मालमत्ता हस्तांतरण नोंद घेणे, नव्याने नळ जोडणी देणे, मालमत्ता कराची आकारणी करणे व मागणी पत्र देणे, प्रलंबित घरगुती विद्युत जोडणीस मंजुरी देणे, मालमत्ता हस्तांतरणानंतर विद्युत जोडणीमध्ये नवीन मालमत्ताधारकांचे नाव नोंदविणे, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेंतर्गत सिंचन विहिरी करिता अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांची ऑनलाईन नोंदणी करणे, अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना अपिल वगळून प्रलंबित वन हक्क पट्टे मंजूर करणे, दिव्यांग प्रमाणपत्र, नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र, विवाह नोंदणी प्रमाणपत्र, आधारकार्ड व पॅनकार्ड सुविधा. नवीन मतदार नोंदणी, जन्म मृत्यु नोंद घेणे व प्रमाणपत्र देणे, शिकाऊ चालक परवाना. रोजगार मेळावा. सखी किट वाटप. महिला बचत गटास परवानगी देणे, महिला बचत गटास प्राधान्याने रोजगार उपलब्ध करून देणे, लसीकरण, ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र, प्रशिक्षित उमेदवारांना रोजगार उपलब्ध करून देणे या सेवांचा समावेश आहे.