दहा विद्यार्थ्यांना परदेशी पाठवण्याचा राजकुमार बडोले फाउंडेशनचा संकल्प

0
8

अर्जुनी मोर.ता. २८ एप्रिल) –विद्यार्थ्यांचे स्वप्न पूर्ण करण्याचा वसा घेत राजकुमार बडोले फाउंडेशनतर्फे परदेशी शिक्षणासाठी विशेष शिष्यवृत्ती मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
या कार्यशाळेला भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

कार्यक्रमात फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष, माजी मंत्री तथा विद्यमान आमदार इंजिनिअर राजकुमार बडोले यांनी महत्त्वपूर्ण घोषणा केली. त्यांनी सांगितले की,
“भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील किमान दहा विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणासाठी पाठवण्याचा संकल्प फाउंडेशनने केला आहे. या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, प्रवेश प्रक्रिया, व्हिसा व आर्थिक मार्गदर्शन फाउंडेशनच्या वतीने करण्यात येईल.”

कार्यक्रमाच्या प्रारंभी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांना श्रद्धांजली अर्पण करून निषेध व्यक्त करण्यात आला.

प्रमुख मार्गदर्शक हेमंत सुटे व निर्वेध सुटे यांनी विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणासाठी लागणाऱ्या परीक्षा (GRE, TOEFL, IELTS), योग्य विषय व विद्यापीठ निवड, शिष्यवृत्तीचे प्रकार, व्हिसा प्रक्रियेबद्दल सखोल मार्गदर्शन केले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राकेश भास्कर, प्रशांत शहारे, प्रशांत उके, अमितकुमार हुमणे, अमोल सांगोळे, आकाश शहारे, टूणेश तरजुले, मिथुन टेंभुर्णे, राजहंस ढोक, कुणाल बडोले, राजेश कठाने, विलास बागडकर, पृथ्वीराज भंडारकर, उमेश पंधरे, सतीश शेंडे व इतर कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली.

हितेश डोंगरे यांच्या लयबद्ध सूत्रसंचालनाने कार्यक्रमाला रंगत आली, तर प्रशांत शहारे यांच्या प्रास्ताविक भाषणाने सर्वांचे मन जिंकले.राकेश भास्कर यांनी केलेल्या हलक्याफुलक्या शैलीतील आभार प्रदर्शनाने वातावरण आणखीनच प्रसन्न झाले.

विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत परदेशी शिक्षणाची स्वप्ने चमकत होती, आणि ती साकार करण्यासाठी राजकुमार बडोले फाउंडेशनने दिलेल्या मदतीचे आश्वासन उपस्थितांना नवीन उमेद देऊन गेले.