समग्र ब्राम्हण सभेतर्फे भगवान परशुराम जन्मोत्सव शोभायात्रेसह विविध कार्यक्रमांचे आयोजन

0
9

डॉ.राजाराम त्रिपाठी यांच्या हस्ते प्रतिभावंताचा सत्कार
गोंदिया : समग्र ब्राम्हण सभा, गोंदियाच्या वतीने भगवान परशुराम यांचा जन्मोत्सव कार्यक्रम मंगळवार २९ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रम दरम्यान भव्य शोभायात्रेसह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच यावर्षी प्रसिध्द बालरोग तज्ज्ञ डॉ.सुधीरकुमार जोशी यांचे आई-वडिल स्व.रघुनाथ गंगाधर जोशी व स्व.मंदाकिनी रघुनाथ जोशी यांच्या स्मृति प्रित्यर्थ समाजातील पीएचडी, सीए, नेटसेट, नीट, जेईई उत्तीर्ण प्रतिभावंताचा सत्कार केला जाणार आहे.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय आयुष मंत्रालयाचे बोर्ड मेंबर पं.डॉ.राजाराम त्रिपाठी, जगदलपूर (छग) यांच्यासह समाजातील गणमान्य मान्यवर प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. तत्पुर्वी महिला मंडळ सभागृहातून सायंकाळी भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. शोभायात्रा शहरातील प्रमुख मार्गाने भ्रमण करीत कार्यक्रमस्थळी पोहोचणार आहे. यानंतर मुख्य कार्यक्रमाला सुरूवात होणार. या कार्यक्रमाला समाज बांधवांनी अधिकाधिक संख्येत उपस्थित राहण्याचे आवाहन समग्र ब्राम्हण सभेतर्फे करण्यात आले आहे.
हेलिकॉप्टरवाले शेतकरी डॉ.राजाराम त्रिपाठी
डॉ. राजाराम त्रिपाठी यांच्या दूरदृष्टीने आणि अतुलनीय ज्ञानाने कृषी क्षेत्राला एक नवीन आयाम दिला आहे. तीन दशकांहून अधिक काळाचा अनुभव, हजारो एकरांवर सेंद्रिय आणि औषधी शेतीचा व्यापक सराव आणि ४० हून अधिक देशांना कृषी भेटी दिल्याने ते जागतिक कृषी क्रांतीचे प्रणेते बनले आहेत. भारतातील सर्वात सुशिक्षित शेतकरी म्हणून ओळखले जाणारे डॉ.राजाराम त्रिपाठी यांनी पाच विषयांमध्ये अनेक डॉक्टरेट पदव्या, एलएलबी आणि एम.ए.पदवी प्राप्त केली आहे. त्यांना देशभरात हेलिकॉप्टर शेतकरी म्हणूनही ओळखले जाते. त्यांच्या असाधारण कामगिरीला १०० हून अधिक प्रतिष्ठित पुरस्कारांनी मान्यता मिळाली आहे. “भारताचा सर्वात समृद्ध शेतकरी” या राष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध पुरस्कार तसेच विविध कृषी मंत्र्यांकडून पाच वेळा “भारतातील सर्वोत्तम शेतकरी” म्हणून त्यांना गौरविण्यात आले आहे.