तिरोडा एसडीओने केला खासदार पडोळेंचा जनता दरबार रद्द

0
269

झाडाखाली उन्हाच्या तडाख्यात बसत खासदाराने घेतला जनता दरबार

गोंदिया,दि.२९ : भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांच्या पुढाकाराने सोमवारी (दि.२८) तिरोडा येथील पंचायत समितीमध्ये जनता दरबार आयोजित करण्यात येणार होता. परंतु प्रशासनाने, विशेषतः तिरोडा येथील उपविभागीय अधिकाऱ्यांनी, नियोजित कार्यक्रम अवघ्या अर्धा तास आधी रद्द केला. हा प्रकार भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील जनतेचा आणि लोकशाही व्यवस्थेचा अवमान आहे अशी संतप्त प्रतिक्रिया खासदार डॉ. पडोळे यांनी व्यक्त केली आहे. जनता दरबारात आपल्या समस्या मांडण्यासाठी प्रचंड मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित झाले होते. अशात खासदार पडोळे यांनी झाडाखाली जनता दरबार आयोजित करून नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या आणि प्रशासनाच्या असंवेदनशीलतेचा पर्दाफाश केला. उपविभागीय अधिकाऱ्यांनी जर काही अडचण होती तर ती खासदारांशी प्रत्यक्ष भेटून किंवा दूरध्वनीवरून लोकसभा अध्यक्षांकडे तक्रार खासदार डॉ. पडोळे यांनी याप्रकरणी लोकसभा अध्यक्षांकडे तक्रार दाखल करणार असल्याचे जाहीर केले. हा फक्त निषेध नव्हे, तर लोकशाही व घटनात्मक अधिकारांवर झालेला घाला आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई झालीच पाहिजे; अन्यथा संसदीय पद्धतीने हक्कभंग प्रस्ताव सादर करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. सांगितली असती. तरीही त्यांनी तसे न करता सरळ जनता दरबार रद्द करण्याचा आदेश सोशल मीडियावर व्हायरल करून प्रोटोकॉलचा भंग केला, हा प्रकार अत्यंत निषेधार्ह असल्याची प्रतिक्रिया खासदार पडोळे यांनी व्यक्त केली.