# महिला खासदार साधणार महिलांशी संवाद
# विविध मार्गदर्शनासह सांस्कृतिक कार्यक्रमाची रंगत
# भारतीय जनकल्यान फॉउंडेशन व रिपोर्टर फोरम चा उपक्रम
# खा.भारती पारधी व सुश्री सरोज पांडे करणार मार्गदर्शन.
आमगांव:– 1 मे रोजी महाराष्ट्र व कामगार दिन निमित्त भारतीय जनकल्याण फाउंडेशन व रिपोर्टर फोरम यांच्या संयुक्त विद्यमाने आमगाव येथे महिलांकरिता सांस्कृतिक कला महोत्सव चे आयोजन करण्यात आले आहे, या कार्यक्रमात महिला खासदार या महिलांशी संवाद साधणार आहेत. आयोजित कार्यक्रमात महिला सांस्कृतिक कला महोत्सवात महिला आपल्या कलांचे अविष्कार घडविणार आहेत.
भारतीय जनकल्याण फाउंडेशन व रिपोर्टर फोरम आमगाव यांच्या संयुक्त विद्यमाने 1 मे महाराष्ट्र व कामगार दिन यानिमित्त आमगाव सांस्कृतिक कला महोत्सव चे आयोजन स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समिती आमगाव येथे दुपारी 11 वाजता करण्यात आले आहे.
आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीमती भारती पारधी लोकसभा सदस्य बालाघाट व प्रमुख वक्ता म्हणून राज्यसभा सदस्य सुश्री सरोज पांडे तसेच प्रमुख अतिथी म्हणून खासदार डॉ. एन.डी. किरसान,विधान परिषद सदस्य डॉ. परिणय फुके, आमदार संजय पुराम, आ. विनोद अग्रवाल,आ. विजय रहांगडाले, आ. राजकुमार बडोले, जिल्हा परिषद चे अध्यक्ष लायकराम भांडारकर, उपाध्यक्ष सुरेश हर्षे,सभापती लक्ष्मण भगत,पौर्णिमा ताई ढेंगे,रजनीताई कुंभरे , दीपाताई चंद्रिकापुरे,माजी जि. प.सभापती सविताताई पुराण,पंचायत समितीच्या सभापती योगिता पुंड, उपसभापती सुनंदा उके, तहसीलदार मोनिका कांबळे, मुख्याधिकारी नगरपरिषद आमगाव करिष्मा वैद्य यावेळी उपस्थित राहणार आहे
आयोजित आमगाव सांस्कृतिक कला महोत्सव निमित्य महिला संवाद कार्यक्रमात महिलांकरिता बचत गट, रोजगार,शासनाच्या योजना व लाभ तर आर्थिक पाठबळ ,बांधकाम मजूर, कमागार योजना याबाबत विविध मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यावेळी महिला उद्दमी यांचे सत्कार करण्यात येणार आहे.
आयोजित कार्यक्रमात महिलां करिता राजे छत्रपती शिवाजी महाराज जीवन दर्शन, लावणी, लोकगीत, माझी वसुंधरा यावर महिला कला अविष्कार सादरीकरण करणार आहेत.
सदर आयोजित महिला महोत्सव हे महिलांना रोजगार मार्गदर्शन व सशक्तिकरण ध्येय ठेवून आयोजित करण्यात आले आहे. कार्यक्रमात महिला उद्यमी महिला बचत गट बांधकाम कामगार यांना मोलाचे मार्गदर्शन मिळणार आहे. सांस्कृतिक कला महोत्सव मध्ये महिला नियोजित विषयावर सादरीकरण करून अविष्कार घडविणार आहेत. आयोजित महिला मेळावा मध्ये महिला व नागरिकांनी अधिक संख्येत उपस्थिती रहावे असे आवाहन कार्यक्रमाचे संयोजक इंजि.प्रा.सुभाष आकरे, यशवंत मानकर, राजीव फुंडे सह आयोजन समिती यांनी केले आहे.