अर्जुनी मोरगांव: तालुक्यातील बाराभाटी येथील पंचशील विद्यालय येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून सत्र समारोपीय समारंभाचे आयोजन विद्यालयाचे मुख्याध्यापक व्ही.एम चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून वनरक्षक महेंद्र चांदेवार, वनरक्षक मंगला चांदेवार, हुमेंद कठाणे, राधेश्याम धानगाये, कमलेश आंदे, गोपाल राऊत उपस्थित होते. यानिमित्ताने स्थानिक भजन मंडळाचा भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
दरम्यान शाळेतील पाचव्या वर्गात शिकत असलेले कुंदन अलोणे व मंजिल बेलखोडे यांनी गोड आवाजात महाराजाची भजने सादर केली. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष व्ही.एम चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी व स्वतःच्या उज्वल भविष्यासाठी मनावर घेऊन अभ्यासात सातत्य ठेवणे गरजेचे असल्याचे समजावून सांगितले तर सहाय्यक शिक्षक ललित पाटणकर यांनी तुकडोजी महारांजाच्या जीवनावर प्रकाश टाकत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक सहायक शिक्षक अनिल घानोडे यांनी केले तर पाहुण्यांचे आभार सहायक शिक्षिका ज्ञानेश्वरी भैसारे यांनी मानले. अल्पोपहाराने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.