लोकसभा पोटनिवडणूक गोंदिया येथील १० मतदान केंद्र इमारतीत बदल

0
12

गोंदिया,दि.२७ : २८ मे रोजी भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणूकीसाठी मतदान होणार आहे. या निवडणूकीत गोंदिया विधानसभा मतदारसंघाअंतर्गत येत असलेल्या मतदान केंद्राच्या इमारतीत मतदारांच्या सुविधेसाठी बदल करण्यात आला आहे. हा बदल इमारती जीर्ण झाल्यामुळे करण्यात आला आहे. १६८-गोंदिया मतदान केंद्र न.प.माध्यमिक हिंदी पाठशाळा मरारटोली ऐवजी आता बी.एच.जे.आर्ट कॉमर्स ज्युनियर कॉलेज गोंदिया, १६९- गोंदिया मतदान केंद्र न.प.माध्यमिक हिंदी पाठशाला मरारटोली ऐवजी आता बी.एच.जे.आर्ट कॉमर्स ज्युनियर कॉलेज गोंदिया, १७०- गोंदिया मतदान केंद्र न.प.माध्यमिक हिंदी पाठशाला मरारटोली ऐवजी आता बी.एच.जे.आर्ट कॉमर्स ज्युनियर कॉलेज गोंदिया. १७१-गोंदिया मतदान केंद्र न.प.सावित्रीबाई फुले मराठी पाठशाला ऐवजी आता बी.एच.जे.आर्ट कॉमर्स ज्युनियर कॉलेज गोंदिया. १७३- गोंदिया मतदान केंद्र न.प.सावित्रीबाई फुले मराठी पाठशाला मरारटोली ऐवजी आता बी.एच.जे.आर्ट कॉमर्स ज्युनियर कॉलेज गोंदिया. २०८-गोंदिया मतदान केंद्र गुरुनानक इंग्लीश प्राथमिक पाठशाला गोंदिया ऐवजी एस.एस.अग्रवाल म्युन्सीपल गर्ल्स हायस्कूल गोंदिया. २०९-गोंदिया मतदान केंद्र गुरुनानक इंग्लीश प्राथमिक पाठशाला गोंदिया ऐवजी एस.एस.अग्रवाल म्युन्सीपल गर्ल्स हायस्कूल गोंदिया. २१५-गोंदिया मतदान केंद्र सेठ प्रताप मराठी टाऊन स्कूल न.प.गोंदिया ऐवजी श्री गुरुनानक प्राथमिक पाठशाला गोंदिया. २१७-गोंदिया मतदान केंद्र सेठ प्रताप मराठी टाऊन स्कूल न.प.गोंदिया ऐवजी बी.एन.आदर्श सिंधी विद्या मंदिर हायस्कूल आर्ट ज्युनियर कॉलेज गोंदिया. २६४-गोंदिया मतदान केंद्र न.प.मराठी प्राथमिक स्कूल गोंदिया ऐवजी न.प.हिंदी प्राथमिक स्कूल रामनगर गोंदिया येथील इमारतीत मतदान केंद्र स्थानांतरीत करण्यात आले आहे. याची मतदारांनी नोंद घ्यावी, असे आवाहन सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी गोंदिया यांनी केले आहे.