गावठी दारु पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर हल्ला, एका पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यु

0
12

अमरावती,दि.27- चांदुर रेल्वे गावठी दारू पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर लोकांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात एका पोलिस कर्मचाऱ्याचा मूत्यु झाला असून एक जण गंभीर आहे. मांजरखेड येथील तांडा परिसरात ही घटना घडली आहे.पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार गावठी दारु पकडण्यासाठी दोन पोलिस कर्मचारी मांजरखेड परिसरात असलेल्याताड्यावर गेले होते, यावेळी तेथील लोकांनी दोन्ही पोलिस कर्मचाऱ्यांवर हल्ला करत त्यांना मारहाण केली, अशी माहिती समोर आली आहे. या घटनेविषयी माहिती मिळताच पोलिस अधीक्षक घटनास्थळी दाखल झाले आहेत.