दरवाढनंतरही दूध उत्पादक संकटात

0
7

भंडारा : दुधाच्या दराविषयी तीन वर्षापासून दूध उत्पादकांना प्रचंड असंतोष असून आंदोलनेही झालीत. राज्य शासनाने अलीकडेच दूध उत्पादकांना योग्य तो न्याय न मिळवून दिल्याने राज्य सरकारने जो निर्णय घेतला, त्यावर भंडारा जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघाने पुढाकार घेवून जिल्ह्यातील दूध उत्पादक सहकारी संस्था व दूध उत्पादक शेतकऱ्यांशी चर्चा घडवून आणली. सभेपुढे शासनाच्या ‘त्या’ परिपत्रकात दुरुस्ती तातडीने करुन दूध उत्पादकांना न्याय द्यावा, असा ठराव घेण्यात आला.
भंडारा जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघाने पुढाकार घेऊन शनिवारला येथील मंगलम सभागृहात चर्चासत्राचे आयोजन केले होते.
या चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी संस्था नागपुरचे विभागीय उपनिबंधक सहकारी संजय क्षीरसागर होते. मुख्य अतिथी म्हणून जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सुनिल फुंडे, तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी निलेश बंड उपस्थित होते.