दोन दिवसाच्या पावसात शास्त्री वॉर्डात पाणीच पाणी
गोरेगावात पांगोली नदीच्या पुरात वाहून गेला युवक
मुरदोली,चांदोरी-बघोली,पिंडकेपार नाल्यावरीवरील पुरामूळे वाहतुक बंद
गोंदिया,दि.28ः- जिल्ह्यासह शहरात दिवसांपासून पावसाची रिपरीप सुरू आहे.मात्र दोन दिवसांपासून येत असलेल्या पावसाने शहरातील प्रभाग क्र.२० मधील शास्त्री वॉर्डाला पुन्हा तलावाचे स्वरूप आले आहे. त्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. त्यातच आजपर्यंत जिल्ह्यात ९२५.५४ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे.दोन्ही दिवस सतत सुरु असलेल्ङ्मा पावसामुळे तिरोडा तालुक्यात अतिवृष्टी झालेली आहे.तर चांदोरी-बघोली रस्ता बंद पडला आहे.गोरेगाव तालुक्यातील म्हसगाव ते कमरगाव रस्त्यावरील नाल्यात कार्तिक भीमराज रहांगडाले पुरात एक युवक वाहून गेल्याची घटना घडली आहे.आपत्तीनिवारणाची चमू घटनास्थळावर पोचली आहे.

पूर्व-भारतात तयार झालेल्या एका कमी दाबाच्या पट्ट्याच्या पूर्व विदर्भात २८ आणि २९ऑगस्ट रोजी पावसाचा जोर वाढेल, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. नदीनाल्यांच्या काठी राहणाèया लोकांनी सावध रहावे. २८ ऑगस्टनंतर पुढचे काही दिवस राज्यात पुन्हा पाऊस कमी होणार असल्याचे मत हवामान तज्ज्ञांनी वर्तविले आहे.
शेतकèयांनी या हवामानाच्या स्थितीनुसार शेतीचे नियोजन करावे, असे आव्हान कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.जिल्ह्याचा वार्षिक सरासरी पर्जन्यमान १३४९.६१ मि.मी.आहे. त्यातच वार्षिक सरासरीचा विचार केल्यास २८ ऑगस्टपर्यंत १०६४.८० मि.मी. पाऊस पडणे अपेक्षित आहे. परंतु, या तारखेपर्यंत ९२५.५४ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. अद्यापही १६ टक्क्यांनी पावसाची सरासरी कमीच आहे. तिरोडा तालुक्यात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली असून ७७.९२ मिमी. पावसाची नोंद करण्ङ्मात आली आहे. गोंदिङ्मा तालुक्यात ४७.५७, गोरेगाव तालुका ६३.०७, अर्जुनी-मोरगाव १३.५२, देवरी २९.३३, आमगाव ५८.२५, सालेकसा ४२.५२ व सडक-अर्जुनी तालुक्यात २६.६७ मिमी.. पावसाची नोंद करण्ङ्मात आली असून जिल्ह्याची सरासरी ४४.८६ मिमी.ऐवढी आहे.त्यातच पुजारीटोला धरणाचे ४ गेट, कालीसराडचे ३ गेट, गोसेखुर्द ३ गेट, धापेवाड्याचे ५ गेट उघडण्यात आले आहे.
पावसाने वॉडार्तील महालक्ष्मी राईस मिलच्या मागील परिसर पाण्याने तुडूंब भरला आहे. नाल्यातील पाणी रस्त्यावर साचत असल्याने येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. विशेष म्हणजे मागील महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने अशीच परिस्थिती निर्माण झाले होती. तेव्हा नगर परिषदेचे मुख्याधिकारी चंदन पाटील यांनी वॉर्डात भेट देवून परिस्थिती पाहणी केली. व आठ दिवसात तोडगा काढणार असल्याचे येथील नागरिकांना आश्वासन दिले. मात्र समस्यांचा विसर पडल्याने येथील नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
