तिरोडा,दि.20 : मागील उन्हाळ्यामध्ये काही अभयारण्यातील गाईड्सवर १५ दिवसाची निलंबनाची करवाई करण्यात आली होती. मात्र,नागझिरा येथे कार्यरत असलेल्या गाईड्सवर निलंबनाची कारवाईसाठी अन्य अभयारण्यात लेखी पत्र देण्यात येते. मात्र, नागझिरा येथे फक्त गेटवर वनपरिक्षेत्र अधिकारी फक्त तोंडी निरोप देवून निलंबनाची कारवाई करीत असल्याचा आरोप गाईड्सनी केला असून या अन्यायाच्या विरोधात गाईड्सनी संपाचा इशारा दिला आहे..
सविस्तर असे की, नागझिरा येथील चोरखमारा गेटवरील गाईड प्रशांत राजकुमार डोंगरे याला २८ मे ते १५ जूनपर्यंत निलंबित करण्यात आले होते. पण त्याला पुन्हा रूजू करून घेण्यात येत नव्हते. शेवटी गोंदियाचे मुख्य वनसंरक्षक यांना तेथील स्थानिक कमिटीने निवेदन दिल्यानंतर सदर गाईडला कामावर घेण्यात आले. पावसाळ्यानंतर १ ऑक्टोबरला अभयारण्य सुरू झाल्यानंतर हा गाईड कामावर होता. नागझिरा व नवीन नागझिरा या दोन्ही अभयारण्याचा प्रवेश चोरखमारा गेटवरूनच आहे. २८ ऑक्टोबरला कलकत्ता येथील सुदिप्ता चटर्जी या पर्यटकासोबत प्रशांत गाईड म्हणून फेरी मारत असताना नागझिèयाचे वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन शिंदे यांनी पर्यटकांसमोरच मी तुला सहा महिन्यासाठी निलंबित केले असताना तु माझ्या वनात आलाच कसा? असा प्रश्न करीत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. शिवाय तुझ्या बापाने मारले नसेल तेवढे मारीन अशा धमक्या दिल्या. तिथे उपस्थित काही कर्मचा?्यांनाही त्यांनी अशाच भाषेचा प्रयोग केला. प्रशांतने याबाबतचे रेकॉर्डिंग मोबाइलवर केले. त्या दिवसापासून त्याला गेटवरून परत पाठविण्यात येत आहे. विचारणा केली असता तुला सहा महिन्याकरिता निलंबित करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. या संबंधाने युनियनने याविषयीचे लिखित पत्राची मागणी केली असता अजूनही संबंधित गाईडला ते देण्यात आलेले नाही व गेले ८-१० दिवसापासून त्याचा प्रवेश बंद करण्यात आला आहे. महत्त्वाचे म्हणजे साकोली येथील वनखात्याचे जिल्हा वनक्षेत्र अधिकारी यांच्या कार्यालयात युनियनतर्फे देण्यात येणारी निवेदने स्वीकारायचे नाहीत असे निर्देश देण्यात आल्याने संवादच करता येत नाही. शिंदे यांच्या अशा वागण्याने नागझिरा येथील गाईडस् नाराज असून त्यांनी संपाचा इशारा दिला आहे. यापूर्वी शिंदे नवेगावबांध येथे असताना अशाच स्वरूपाच्या तक्रारी युनियनकडे येत असत.
दोन वर्षांपूर्वी नवेगावबांध व नागझिèयाच्या गाईडस्ना शिंदे यांनी कान्हा येथे प्रशिक्षणासाठी नेले असता त्यांच्या व्यवहारात अनेक तक्रारी होत्या व त्याबाबत गाईडस्नी प्रश्न उपस्थित केले असता त्यांना आरोपपत्र देण्यात आले, अशा अधिकाèयामुळे गाईडस्मध्ये रोष निर्माण होतो. त्यामुळे सचिन शिंदे यांच्यावर अनुशासनात्मक कारवाई करण्यात यावी व प्रशांतला अविलंब कामावर घेण्यात यावे, अशी मागणी युनियनतर्फे करण्यात आली आहे. नाही तर,गाईड युनियनने संपाचा इशारा दिला आहे..