गोंदिया,दि.20: सर्व समान्य मुलांप्रमाणे दिव्यांग मुलासुद्धा शिक्षणाचा अधिकार आहे. त्यांना समाजात सन्मानाने जागता यावे याकरिता त्यांचे मूलभूत हक्क मिळवून देणे हे प्रत्येकाचे कर्तव्य असल्याचे प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ राजा दयानिधी यांनी केले. ते सर्व शिक्षा अभियानाच्य दिव्यांग विभागामार्फत आयोजित जिल्हा परिषदेच्या स्व: वसंतराव नाईक सभागृहातील कार्यशाळेत बोलत होते. कार्यशाळेला शिक्षणाधिकारी उल्हास नरड, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ मनोज राऊत,अति.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. चौरागडे, उपशिक्षणाधिकारी लोकेश मोहबंशी, सहयोगी प्राध्यापक प्रफुल्ल शिंदे, लेखाधिकारी महेंद्र लांडे, जिल्हा समन्वयक विजय ठोकणे, संजय बिसेन आदी मान्यवर उपस्थित होते.
सर्व शिक्षा अभियानाच्या दिव्यांग विभागा मार्फत ० ते ६ वयोगटालित कर्णबधिर मुलांच्या कॉक्लियर इम्प्लांट ही शस्त्रक्रिया केंद्र शासनाच्या एडीप या योजने अंतर्गत करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने पहिल्या टप्प्यातील अश्या मुलांच्या पालक, शिक्षक व विशेष शिक्षकासाठी नागपुर येथील समेकित क्षेत्रिय केन्द्रामार्फत एक दिवसीय कार्यशाळेचे आयोयजन करण्यात आले होते. डॉ राजा दयानिधी म्हणाले की दिव्यांग मुलंकारिता काम करतांना निश्चित वार्षिक लक्ष निर्धारित करुन अधिकाधिक मुलांना लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न केल्याबद्दल कर्मचाèयांचे अभिनंदन केले. यावेळी शिक्षणाधिकारी नरड़ यांनी सुद्धा विभागांतर्गत राबविण्यात येणाèया योजनांची माहिती दिली. यावेळी कार्यशाळेत समेकित क्षेत्रीय केंद्र नागपुरचे डॉ प्रफुल्ल शिंदे यांनी ही मार्गदर्शन केले. आयोजनासाठी विजय ठोकने, दिलीप बघेले, राजेश मते,जगदीश राणे, रमेश पटले, विकास लिल्हारे, राजकुमार गौतम,संजय गालपल्लीवार, भूषण गजभिये, गजानन धावड़े, थानसिंह बघेले आqदनी सहकार्य केले.