पोलिस उपनिरीक्षक वर्षा नैताम यांना ‘तेजस्विनी कन्या’ पुरस्कार जाहीर

0
24

गडचिरोली,दि.23ःःमहिला आर्थिक विकास महामंडळ मुंबईद्वारे माविमच्या ४४ व्या वर्धापन दिनानिमित्त नागपूर विभागातर्फे ‘तेजस्विनी कन्या’ दिल्या जाणार्‍या पुरस्करासाठी गडचिरोली येथील नक्षल सेल पोलिस अधीक्षक कार्यालयातील पोलिस उपनिरीक्षक वर्षा तुकाराम नैताम यांची राज्यपातळवरील समितीद्वारे एकमताने निवड करण्यात आली असून सदर पुरस्कार २४ फेब्रुवारी रोजी मुंबई येथे मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.
वर्षा नैतम ह्या ज्ञानगंगा स्वयहाय्यता महिला बचत गट वसा, ता.जि. गडचिरोली येथील शोभा तुकाराम नैताम यांच्या कन्या आहेत. माविम गडचिरोलीद्वारे १९९८ मध्ये महाराष्ट्र ग्रामीण पाणीपुरवठा कार्यक्रमांतर्गत सदर बचतगटाची स्थापना करण्यात आली. वर्षा नैताम ह्या क्रांतिकारी स्वयंसहाय्यता महिला बचत गट वसा ता.जि. गडचिरोली येथे २00६ पासून बचतगटामध्ये सदस्य आहेत. सदर पुरस्कार स्विकारण्याकरिता पोलिस उपनिरीक्षक वर्षा नैताम  मुंबईला रवाना झाल्या आहेत.