भाजपपाठोपाठ पटेलानेही पोवार समाजाच्या नेत्यांना नाकारले

0
46

गोंदिया,दि.25- भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातील या निवडणुकीत उमेदवारांच्या निवडीला घेऊन चांगलेच वातावरण तापले गेले.भारतीय जनता पक्षाकडे नेहमी मोठ्या संख्यने वोट बँक म्हणून असलेल्या पोवार समाजाला यावेळी उमेदवारी कायम राहील हा अंदाज भाजपच्या वरिष्ठांना फोल ठरविले.आणि मागच्या निवडणुकीतील पराभूत उमेदवारासह माजी खासदारांनाही पक्षाने योग्य न समजल्याने भाजपची उमेदवारी मिळू शकली नाही.त्यामुळे या समाजाने आता राष्ट्रवादी काँग्रेसकडे आपली नजर रोखून ठेवली होती.भाजपनंतर राष्ट्रवादी-काँग्रेसकडे हा समाज वळलेला आहे.परंतु आजपर्यत राष्ट्रवादीने एकही पोवार आमदार तिरोड्यातून तर होऊ दिला नाही.त्यानंतरही पटेलासाठी त्या पक्षात काम करणार्यांना किमान लोकसभा निवडणुकीत भाईजी पोवार समाजाला स्वतः न लडण्यास प्राधान्य देतील अशी अपेक्षा होती.परंतु पटेलांनीही अखेर भाजपच्या हो ला हो देत राष्ट्रवादीतील पोवार नेत्यांना तुम्ही फक्त जिल्हाध्यक्ष,जिल्हा परिषद सदस्यापुरतेच राहण्याचा सल्ला लोकसभेची उमेदवारी जाहिर करतांना दिसून आल्याने राष्ट्रवादीतही घुसफूस सुरु झाली आहे. प्रफुल पटेल स्वतः निवडणुक लढणार नसले तर पोवार समाजाचे म्हणून पंचम बिसेन यांना उमेदवारी देऊन नवे राजकीय समीकरण तयार करावे अशी अनेकांची इच्छा होती.काही इतर नेत्यांनाही ते मान्य होते,परंतु पटेलांच्या या भूमिकेमुळे हा मतदार काय निर्णय़ घेतो याकडे लक्ष लागले आहे.